हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे परंपरा नुसार पुस्तक, शाल देऊन सत्कार..।
औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबाद च्या दौऱ्यावर महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख, कार्यसक्षम मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे साहेब आलेले असता आज त्यांची भेट हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी औरंगाबाद च्या विमानतळावर घेतली व विविध विषयांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
खालील मुद्यांवर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आला...
१) मुस्लिम सामाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर मुस्लिम समाजाला शैक्षणिक आणि नौकरी क्षेत्रात कमीत कमी १०% टक्के आरक्षण देण्यात यावे.
२) मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी भारत रत्न डॉ. ए. पी जे कलाम यांच्या नावाने स्वायत्त संस्था स्थापन करावी.
३) जवळपास 2 वर्षांपासून शाळा बंद आहे आता सर्व नियमावली सह विद्यार्थ्यांसाठी शाळेचे दार उघडण्यात यावे.
४) विनाअनुदानित शाळांना त्वरित अनुदान देण्यात यावे.
५) शिक्षकांसाठी त्वरित कॅशलेस आरोग्य योजना अंमलात आणावी.
या सर्व विषयांवर मुख्यमंत्री साहेबांचे लक्ष वेधले व त्यांना विनंती केली की आमच्या निवेदनावर त्वरित आपण आपल्या स्तरावर ठोस निर्णय घेऊन विद्यार्थी व शिक्षकांना न्याय देण्याचे काम आपण कुटुंब प्रमुख या नात्याने करावे ही विनंती करण्यात आली यावर राज्याचे कार्यसक्षम मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे साहेब यांनी सर्व विषयांवर लवकरच बैठक घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राज्याचे ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेब, माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेब, हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन सर आदींची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .