नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना राज्य शाखेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,अर्थमंत्री अजित पवार, प्रधान सचिव वित्त विभाग, यांना राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांच्या स्वाक्षरीचे निवेदन नुकतेच मेल करण्यात आले. महाकोशाच्या बीईए एम एस प्रणाली वरून भविष्य निर्वाह निधी बीडीएस निघण्याची प्रणाली तात्काळ सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग स्तरावरून दि.14 मार्च2021पासून महाकोषच्या बीईए एम एस प्रणाली वरून भविष्य निर्वाह निधी निघण्याची प्रणाली बंद होती .
संघटनेच्या मागणीनंतर मध्यंतरी थोडे दिवस सदर प्रणाली सुरू झाली व काही प्रकरणे निकाली निघाली पण गेली जवळपास दिड महिना झाले पुन्हा सदर प्रणाली बंद पडल्याने राज्यातील शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी मधून परतावा निधी,ना परतावा निधी मिळण्यासाठी अंतिम देयक कोषागार कार्यालयात सादर करता आलेली नाही. आज रोजी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांची शेकडो प्रकरणे गेले सहा महिने पासून प्रलंबित असल्याने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता देयके अभावी वैद्यकीय उपचार व इतर वैद्यकीय उपचार, मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण , यामुळे आर्थिक तणावात राज्यातील शिक्षक वावरत आहे.
तरी संबंधित शिक्षकांना आपल्या भविष्य निर्वाह निधी मधून निधी मिळण्यासाठी महाकोशाच्या प्रणाली वरून भविष्य निर्वाह निधीची बी डी एस प्रणाली तात्काळ सुरू करण्याच्या मागणीच्या निवेदनावर राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांच्या स्वाक्षरी असल्याची माहिती राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे,राज्य उपाध्यक्ष जी .एस. मंगनाळे , जिल्हा नेते गनु जाधव, जिल्हा अध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे , माहुर तालुका अध्यक्ष एस.एस.पाटील,किनवट तालुका अध्यक्ष राजकुमार बाविस्कर, कंधार तालुका अध्यक्ष मोबिन शेख , हदगाव तालुका अध्यक्ष नागनाथ गाभणे,भोकर तालुका अध्यक्ष केशव कदम यांनी दिली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .