जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशालेत 'हिंदी दिन' उत्साहात साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 




सांगली  ( विद्या चौगुले ) :         
सांगली येथील सरोवर शिक्षण मंडळ साऊथ संचलित जीवन विकास मराठी माध्यमिक प्रशाला व डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम ज्युनिअर कॉलेज मध्ये दि.14 सप्टेंबर रोजी 'हिंदी दिन'उत्साहात साजरा करण्यात आला.         या प्रसंगी संस्थापक मा. हाजी मुनीरुद्दीन मुल्ला सर, अध्यक्ष मा. फारुख अकिवाटे सर, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.  


स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.हिंदी ही राष्ट्रभाषा असून तिला गौरवशाली परंपरा आहे. आणि ती सर्वत्र बोलली जाणारी भाषा आहे असे मत मार्गदर्शनपर भाषणात मा. मुनीरुद्दीन मुल्ला सरांनी व्यक्त केले. तर हिंदी भाषेचा सन्मान वाढवा असे मत प्रास्ताविकपर भाषणात मा.अध्यक्ष फारुख अकिवाटे सरांनी मांडले. हिंदी अध्यापिका सौ. प्रमिला कांबळे मॅडम यांनी हिंदी साहित्यिकांची ओळख करून दिली. विदयार्थ्यांनीही आपले मनोगत मांडले.निबंधलेखन, चित्रकला,  स्पर्धेत क्रमांकप्राप्त विदयार्थी यशोदा रणधीर,साद बागवान आदिल आलासे, सिद्दीक शेख,पूजा माळी, अतिया विजापूरे,नंदिनी माळी, यांना बक्षिस वितरण करण्यात आले.                   


शालेय परिसरात रांगोळीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. अल अमीन मराठी प्रायमरी स्कूल च्या मुख्याध्यापिका शहेनाज नदाफ, जीवन विकास प्रशालेचे मुख्याध्यापकश्री.कुरणे सर, कॉलेजचे प्राचार्य श्री. माळी सर,पिरजादे मॅडम, सरामद जयनब इमाम उर्दू स्कूलच्या शिक्षिका शबाना नदाफ मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.             


कार्यक्रमप्रसंगी स्वागत कुरणे सर, आभार सौ उषा जाधव मॅडम यांनी तर सूत्रसंचालन सानिया विजापुरे हिने केले. या प्रसंगी श्री अबुबकर  भालदार सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन कांबळे मॅडम यांनी व मार्गदर्शन सौ. विद्या चौगुले मॅडम यांनी केले. श्री. बी. पी.पाटील सर, श्री एम. एस. मुल्ला सर, व श्री.रामदास हिंगसे यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे अतिशय चांगल्या प्रकारे संयोजन केल्याबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)