"चित्रशब्द गाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची" या हस्तलिखित विशेषांकाचे विमोचन !

शालेयवृत्त सेवा
0

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेतील विषय शिक्षक  मिलिंद जाधव यांचा उपक्रम !


नांदेड ( प्रल्हाद जोंधळे ) :

भोकर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत विषय शिक्षक  मिलिंद जाधव यांच्या मेहनतीतून साकारलेल्या  "चित्रशब्द गाथा- मराठवाडा मुक्ती संग्रामाची " या हस्तलिखित विशेषांकाचे विमोचन  उपशिक्षणाधिकारी तथा भोकरचे गट शिक्षणाधिकारी डॉ.डी. एस.मठपती यांच्या हस्ते १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी करण्यात आले.


 मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या व  हुतात्म्यांच्या रेखाचित्रांचे व त्यांच्या जीवनकार्याबद्धल माहितीचे लेखन करून विद्यार्थ्यांच्या अंगी कलेसह ऐतिहासिक जाणीव व व राष्ट्रीय मूल्ये रूजविणे अशा उद्यीष्टांने केलेले हस्तलिखित विशेषांकाची निर्मिती अभिनंदनिय आहे. शिक्षणात वाढत्या तंत्रज्ञानचा वापर व दुसरीकडे दुर्लक्षित कला संस्कृती जपण्याचे कार्य काही शाळेत चालू आहे याचा आनंद वाटतो. अशा शब्दात डॉ.मठपती यांनी प्रतिक्रिया दिली.


 मराठवाडा मुक्तिसंग्राम  दिनाच्या ध्वजारोहणानंतर गट साधन केंद्र येथे या हस्तलिखित विशेषांकाचे  विमोचन झाले. डायट प्राचार्य डॉ.रवींद्र आंबेकर, प्रा.डॉ.श्रीकिशन देशमुख यांनी सोशल माध्यमातून  प्रतिक्रीया दिली. शिक्षण विस्तार अधिकारी माधव वाघमारे, दिलीप सुपे, विजय महाजन, सर्व केंद्र प्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.  केंद्रप्रमुख जे.एम. शेख, मुख्याध्यापक सुधीर सुरंगलीकर यांनाही शाळेत राबवत असलेल्या उपक्रमासाठी मिलिंद जाधव यांना  शुभेच्छा दिल्या.


विमोचन प्रसंगी विषय तज्ञ जगदिश थडवे, विशेष शिक्षक सुधांशू कांबळे, डेविड ग्रॅहम्बल, आनंदा खांडेकरआदिनी सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)