आर.आर. जाधव सराची कविता : शाळा कवा करता सुरू ..?

शालेयवृत्त सेवा
1



 शाळा कवा करता सुरू ..?




डोस्क बिघडत चालल,

माहय ईचार करू करू..

तुम्हीच सांगा साहेब,

शाळा कवा करता सुरू ..

                         


बरं होतं तवा पोट्ट 

शाळेमध्ये जाये,

दिसभर कामात राबून

जीव सुखी राये,

पोट्ट घरी रायल्याने

जीव लागे गुदमरु..

 तुम्हीच सांगा साहेब,

शाळा कवा करता सुरू..



मास्तर कसे सांभाळते,

त्यान्लेच माहित बाप्पा,

वैतागलो याच्या करणीन,

हा खूपच मारतो थापा,

पोट्ट टेन्शन लई देते,

मग घेतो थोड़ी दारू..

 तुम्हीच सांगा साहेब..



शेजाऱ्याच्या पोरासंगे,

रोजच करते भांडण,

त्याची माय त्याले,

मग काउन नाही कांडण

स्माजावून पाहयलं त्याले,

म्हणे मी कायले डरू..

तुम्हीच सांगा साहेब..


    

घरचे सारे वैतागले,

पोरानं आणला खेव,

त्याले नाही वाटत,

आता कोणाचच भेव,

चिंता करून त्याची,

जीव लागतो झुरू..

तुम्हीच सांगा साहेब..



गुरुजी तुम्हीच महान,

आता समदयानाच कळले,

सारेच काम करून,

ज्ञानदानाकडे वळले,

कृतज्ञता दाखवून ,

पाय तुमचे धरू..

तुम्हीच सांगा साहेब..



कोरोनानं अभ्यासाची,

कमी झाली गती,

चिंता वाटते भविष्याची,

होऊ नये माती,

सारे मिळून शिक्षणाचा,

निर्धार आता करू. .


तुम्हीच सांगा साहेब,

शाळा कवा करता सुरू..

     


-आर. आर. जाधव

केन्द्रप्रमुख/शिविअ

दहेली/किनवट

     

टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा