शिक्षण विभागाने काढला सुधारीत आदेश !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
नांदेड जिपच्या शिक्षण विभागाने जिल्हयातील दिवाळी सुट्टयांबाबतचा संभ्रम आज दूर केला. शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर रोजी NAS परिक्षा असलेल्या शाळांतील शिक्षक व विद्यार्थीच शाळेत उपस्थित राहतील. बाकी शाळांना उदया १२ नोव्हेंबरपासुन तर NAS परिक्षा असलेल्या शाळांना १३ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत सुट्टया २१ नोव्हेंबरला रविवार तेंव्हा नांदेड जिल्हयातील शाळां आता सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पासुन नियमितपणे सुरु होतील.
वाढीव दिवाळी सुट्टयांच्या नियोजनाबाबत नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ.मंगाराणी अंबुलगेकर मॅडम, मुकाअ मा.सौ.वर्षा ठाकुर मॅडम (IAS), शिक्षण सभापती मा.संजयजी बेळगे साहेब, शिक्षणाधिकारी (मा.) मा.प्रशांतजी दिग्रसकर साहेब, शिक्षणाधिकारी (प्रा.) मा.सौ.सविता बिरगे मॅडम यांच्या सोबत जिल्ह्यातील अनेक संघटनानी चर्चा केली होती.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .