डी.एल.एड्. परीक्षा नोव्हेंबर २०२१ पूर्व नियोजीत वेळापत्रकाप्रमाणेच होणार!

शालेयवृत्त सेवा
0

 




मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) 

"महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०१" यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यामध्ये घेण्यात येणारी डी.एल.एड्. परीक्षा नोव्हेंबर २०२१ ही दि. १६/११/२०२१ ते २५/११/२०२१ या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्हयामध्ये ८८ परीक्षा केंद्रे निश्चित केलेली आहेत. तसेच परिरक्षक ठिकाणांची संख्या ७१ आहे. परीक्षा केंद्रावर दोन सत्रामध्ये डी.एल.एड्. परीक्षेचे आयोजन केलेले आहे.



परीक्षा केंद्रांची व परिरक्षक ठिकाणांची यादी सुलभ संदर्भासाठी परिषदेमार्फत  पत्राद्वारे पाठविलेली आहे. या परीक्षेचे गोपनीय साहित्य परिषदेमार्फत सर्व परीक्षा केंद्रसंचालककांकडे व परिरक्षकांकडे दि.१२/११/२०२१ रोजीच पोहोच करणेत आलेले आहे. तसेच सदर परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या राज्यातील एकूण ३२,८७६ विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेमार्फत वितरीत केलेली आहेत.



सद्यस्थितीत राज्यातील काही जिल्हयांमध्ये कर्फ्यू / संचारबंदी लावण्यात आलेली आहे मात्र परिषदेमार्फत आयोजीत केलेली डी.एल.एड्. नोव्हेंबर २०२१ ची परीक्षा पूर्व नियोजीत असल्याने ती वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहे. ज्या जिल्हयांमध्ये कर्फ्यू, संचारबंदी लावण्यात आलेली आहे त्या जिल्हयांमध्येही सर्व प्रविष्ट परीक्षार्थ्यांना परिषदेमार्फत देण्यासद्यस्थितीत राज्यातील काही जिल्हयांमध्ये कर्फ्यू / संचारबंदी लावण्यात आलेली आहे मात्र परिषदेमार्फत आयोजीत केलेली डी.एल.एड्. नोव्हेंबर २०२१ ची परीक्षा पूर्व नियोजीत असल्याने ती वेळापत्रकाप्रमाणेच होणार आहे. ज्या जिल्हयांमध्ये कर्फ्यू संचारबंदी लावण्यात आलेली आहे त्या जिल्हयांमध्येही सर्व प्रविष्ट परीक्षार्थ्यांना परिषदेमार्फत देण्यात आलेली प्रवेशपत्र पाहून तसेच परीक्षा केंद्र व परिरक्षक ठिकाणावरील कर्मचाऱ्यांना व सदरची परीक्षा सुरळीत पार पडणेसाठी परिषदेमार्फत नेमणेत आलेल्या भरारी पथकातील सदस्यांना परीक्षा केंद्रावर जाणेस परवानगी देण्यात यावी ही विनंती महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. व त्याची प्रत सर्व जिल्हा अधिकारी व पोलीस आयुक्ताकडे पाठवली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)