सभासद संख्येच्या प्रमाणात सहकारी संस्थेत महिलांना प्रतिनिधित्व मिळावे..

शालेयवृत्त सेवा
0

 

(निवेदन देताना महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्यनेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, सुनिता इटनकर,नारायण कांबळे, बाबुराव माडगे आदींची उपस्थिती होती.अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा माहुर तालुकाध्यक्ष एस एस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जी.बी.मोरे यांनी दिली आहे. )


सहकार आयुक्त अनिल कवडे यांना पुरोगामी शिक्षक संघटनेचे निवेदन

     

 नांदेड-  राज्यातील सहकारी संस्थामध्ये महिला सभासदही मोठ्या प्रमाणावर असल्याने सभासद संख्येच्या प्रमाणात महिलांना संचालक पदावर प्रतिनिधित्व मिळण्यासाठी संबधीत संस्थाना घटना दुरूस्ती करण्याचे निर्देश व्हावेत या मागणीचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे, राज्यनेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखाली सहकार आयुक्त अनिल कवडे यांना देण्यात देण्यात आले.


     सहकार आयुक्त यांचे वतीने राज्याचे सहाय्यक निबंधक गणेश कौटे यांनी निवेदन स्विकारले.

      संघटनेने दिलेल्या निवेदनामध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला 50% आरक्षण असताना सहकारी संस्था मध्ये महिलांसाठी फक्त दोनच जागा राखीव असतात. बहुतांश सहकरी संस्थामध्ये महिला सभासदांचे प्रमाण 30 ते 40 टक्के असताना फक्त 2 महिलांना प्रतिनिधित्व असणे ही बाब न्यायसंगत नसल्याने राज्यातील सहकारी बँका व पतसंस्थामध्ये सभासदांच्या प्रमाणात महिलांना संचालक पदावर प्रतिनिधित्व मिळण्यासाठी संबंधित संस्थाना घटना दुरूस्तीचे निर्देश व्हावेत अशी मागणी करण्यात आली.


      यावेळी संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, यांचेसह सरचिटणीस हरीश ससनकर, महिला राज्याध्यक्ष अल्का ठाकरे, राज्य उपाध्यक्ष  जी.एस.मंगनाळे, राज्य संघटक पी.आर.पाटील, कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी एस.के.पाटील, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे, बाबुराव माडगे, सुनीता इटनकर, अशोक खाडे, अरुण चौधरी,जी.बी.मोरे आदी उपस्थित होते.

  

पुरोगामी शिक्षक संघटनेतच महिलांचा सन्मान.. अलका ठाकरे ..

     महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेत सुरूवातीपासूनं राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर महिला शिक्षिकांच्या कार्यकारणी कार्यरत असून महिलां शिक्षिकांचा सन्मान पुरोगामी शिक्षक संघटनेतच होत असून सदर मागणी मान्य होईपर्यंत पुरोगामीचा पाठपुरावा सुरूच राहणार..

अलका ठाकरे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)