पंधराव्या वित्त आयोगातून शालेय साहित्याचे वाटप..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शंकर गच्चे ) :

 दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी गट ग्रामपंचायत दाबदरी तर्फे 15 व्या वित्त आयोगातून दाबदरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तीन शाळा व तीनअंगणवाड्या यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यात काळूवाडी, दाबदरी व भोंडणी तांडा या गावच्या शाळांचा व अंगणवाड्यांचा समावेश होता. या प्रत्येक शाळेला लोखंडी कपाट, टेबल, खुर्च्या अशा साहित्याचे वाटप करण्यात आले .


यावेळी माझी पंचायत समिती सदस्य तथा दाबदरी गावचे उपसरपंच बालाजी दादा राठोड व सरपंच गणपतराव भिसे यांच्या पुढाकारातून हिमायतनगरचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय माधवराव वानोळे साहेब, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बालाजी चिंतलवार साहेब, ग्राम विकास अधिकारी विठ्ठल जक्कीलवाड, प्राथमिक पदवीधर शिक्षक विनोद जाधव धानोरा, केंद्रप्रमुख दत्ताञ्य धात्रक केंद्र सिरंजनी, केंद्रप्रमुख संजयजी जान्ते केंद्र पोटा बुद्रुक, केंद्रप्रमुख नामदेव राठोड केंद्र टेंभी, गजानन भुतनर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दाबदरी आदि उपस्थित होते .


यावेळी दाबदरी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा बनकर , काळूवाडी शाळेचे मुख्याध्यापक बामनाची कदम , वायवाडी शाळेचे मुख्याध्यापक के.बी. कल्याणकर ,भोंडणी शाळेच्या मुख्याध्यापिका दैवशाला सावंत, सहशिक्षक अनिल कटके , सुधाकर गायकवाड , दीपक शिंदे, संजय कुलकर्णी आशा जव्हेरी , संतोष झगडे, विश्वनाथ दंतपल्ले, रामजी राठोड, राम राठोड दाबदरी येथील शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा बनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल कटके यांनी केले काळूवाडी आणि भोंडणी तांडा येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर गच्चे यांनी केले. तर आभार प्रदर्शन बामनाचे कदम व के.बी. कल्याणकर यांनी केले.यावेळी गावातील प्रतिष्ठित मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)