विविध मागण्याचे शिक्षण आयुक्तांना दिले निवेदन !
पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
शिक्षण आयुक्त कार्यालयात शिक्षण आयुक्त डॉ मा. विशाल सोळंकी , शिक्षण संचालक (प्राथमिक) मा.दिनकर टेमकर , शिक्षण संचालक माध्यमिक मा महेश पालकर व अमरावती विभागाचे आमदार मा. श्रीकांत देशपांडे यांची आज राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाच्या वतीने भेट घेऊन आपल्या मागण्या विषयी निवेदन देऊन चर्चा केली आहे.
चर्चा सकारात्मक झाली असुन कायम स्वरुपी ओळख पत्र लवकरात लवकर देण्यात येईल. राज्यस्तरावरील शासनाकडे आपल्या मागण्या पाठविण्यात येतील .असे आश्वासन आमदार श्रीकांत देशपांडे यांनी दिले तर मागण्यांचे निवेदन शिक्षण आयुक्त कार्यालयात आयुक्त साहेब यांच्या वतीने मा श्रीराम पानझडे शिक्षण उपसंचालक प्रशासन व डॉ वंदना वाहूळ उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक ,व स्वीय सहाय्यक महेंद्र कुलकर्णी, यांनी स्वीकारले आहे.
यावेळी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर,राज्य सरचिटणीस अनंता जाधव ,कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे सहसचिव माधव वायचाळ,उपाध्यक्ष संभाजी ठुबे राज्य प्रवक्ता सुनिल गुरव , जिल्हाध्यक्ष सुभाष सावंत ,रमेश गंगावणे, भिमराव शिंदे,सचिव संजय गिरी, आदि उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .