दत्तनगर शाळेला गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांची आकस्मिक भेट

शालेयवृत्त सेवा
1 minute read
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील घोटी केंद्रांतर्गत असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तनगर ( घोटी ) येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले .


शाळा प्रवेशोत्सव आणि शाळा पूर्व तयारी कार्यक्रमांतर्गत सकाळी मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर पहिली प्रवेशित मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शालेय पोषण आहार अंतर्गत स्वादिष्ट भोजन देत असताना गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांनी भेट देऊन पाहणी केली. परिसर स्वच्छता आणि शालेय बाबी व्यवस्थित आढळून आल्याने शिक्षकांचे कौतुक केले.


यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय मुरमुरे , डॉ. भुरे , मुख्याध्यापक पी.डी. बनवसकर, सहशिक्षक एस.व्ही. जाधव, विषयतज्ञ येडे ताई , अंगणवाडी सेविका बोंडारकर ताई उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)