नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
“इंग्रजी हा विषय भीतीने शिकण्याचा नसून योग्य पद्धतीने, साध्या इंग्रजीत उत्तरलेखन केल्यास तो अधिक गुण मिळवून देणारा विषय ठरतो,” असे प्रतिपादन इंग्रजी विषयाचे अभ्यासक तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. हेमंत कार्ले यांनी केले.
जिल्हा परिषद हायस्कूल चौफाळा, नांदेड येथे विद्यार्थ्यांसमोर ‘Simple English, More Marks’ या शीर्षकाखाली आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात अधिक गुण मिळवण्यासाठी काही गोल्डन टिप्स दिल्या. साधे व अचूक इंग्रजी वापरणे, हस्ताक्षर नीटनेटके ठेवणे तसेच पत्र, अर्ज, निबंध आदींचे formats व structure वारंवार उजळणी करून पक्के करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमात श्रीमती जयश्री चौधरी यांच्या वतीने इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या अध्ययन साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच स. ना. भालेराव यांनी दहावीनंतर पुढे काय? या विषयावर विद्यार्थ्यांना यथोचित व मार्गदर्शक माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कच्छवे होते. यावेळी एच. पी. कानोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोरशेटवार यांनी केले. या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाविषयी भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढल्याची भावना उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली..


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .