जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा चा उपक्रम !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मारतळा दिनांक 12 डिसेंबर 2023 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मारतळा परिसरात आलेल्या गुजरात राज्यातील भूज जिल्ह्यातील अंजार गावातील आलेल्या सहा कुटुंबाशी भेट घेऊन त्यांची दिनचर्या जाणून घेतले यावेळी त्यांच्या कुटुंबातील मोहन रबारी यांनी त्यांच्या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
ते म्हणाले मागील 30 वर्षापासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आम्ही फिरत असतो फिरत असताना आमच्या मुलांच्या शिक्षणाकडे मात्रांची दुर्लक्ष नाही आमची मोठे मुलं गुजरात राज्यात वस्तीगृहात शिक्षण घेत आहेत तसेच त्यांच्याकडे हजार मेंढ्या , आठ उंट, काही कुत्रे कुटुंबासह राहतात मुलांना त्यांच्या वेशभूषेविषयी, त्यांच्या गुजराती भाषेविषयी विशेष आकर्षण दिसून आले कारण महिला या तोंडावर घुंगट घेऊनच होत्या त्यांच्या संस्कृतीनुसार पर पुरुषासमोर महिला आपलं तोंड दाखवत नाहीत हे इथं अधोरेखित होताना दिसत होताना दिसत होतं.
वाळवंटातील जहाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंटाला पाहून विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटला तसेच त्यांचे सर्व साहित्य रानात राहताना साधारण उंच असणाऱ्या लोखंडी बाजा मुलांना पाहता आल्या. क्षेत्रभेटीमुळे मुलांना गुजरात राज्यातील वाळवंटी प्रदेशातील लोकांचे लोकजीवन कसे आहे हे प्रत्यक्ष अनुभवातून शिकता आले. यावेळी उपक्रमशील शिक्षक रवी ढगे,शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव मुगावे, डी डी होळकर, श्रीमती उज्वला जोशी, बालाजी प्यारलावार, रमेश हनमंते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .