शाळा स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात

शालेयवृत्त सेवा
0

 विद्यार्थ्याने 36 प्रयोगाचे केले सादरीकरण


        

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा ता.जि. नांदेड येथे आज दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी शाळा स्तरावरील विज्ञान प्रदर्शन भरवले.असून त्यात एकूण 36 प्रयोगांची मांडणी करण्यात आली.इयत्ता 5 वि,6 वि आणि सातवी मधील विदयार्थ्यांनी सोपे,मध्यम आणि उच्च दर्जाचे प्रयोग त्यांच्या विज्ञान शिक्षिका सुलभा रत्नपारखी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खूप कमी वेळात मांडणी केली.

          शाळेचे मुख्याध्यापक पोहरे सर यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे रीतसर उदघाट्न करण्यात आले तर निळा गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच,समितीचे अध्यक्ष आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. विदयार्थ्यांनी आपल्या प्रयोगाचे उत्कृष्ट रित्या सादरीकरण केले.

            तसेच शाळेतील एक विध्यार्थी समर्थ मारोती जोगदंड काल झालेल्या इस्रो च्या केंद्रस्तरिय परीक्षेत गुणांणूक्रमे 66 गुण घेऊन केद्रस्तरावरून दुसरा आल्याबद्दल सरपंच सौ.कोमल रोहित हिंगोले यांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील तालूकास्तरिय परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

            वर्गशिक्षिका श्रीमती पांडे मॅडम यांनी समर्थ जोगदंड ला उत्तेजनार्थ बक्षीस दिले तर मुख्याध्यापक पोहरे सर यांनीही त्यास 100 रुपयाचे पारितोषिक दिले.

          



आज एकूण 36 प्रयोगची मांडणी करण्यात आली होती.


1)टाचणी टोचली तरी फुगा फुटत नाही - प्रियंका वाघमारे

2)बर्फाच्या बोटाने तांदूळ उचला   टोचत नाही - तनुजा जोगदंड

3)कुलर - पुजा कऱ्हाळे

4)सात रंगातून एकच रंग दिसतो -धनश्री कदम

5)कांद्याच्या पेशीचे निरीक्षण - सानिका जोगदंड

6)चॉकलेट, बिस्कीट,चिप्स, तेलाचे पाकीट,साबण,औषध इत्यादी पदार्थाचे निरीक्षण करून अभ्यास करणे - तनिष्का इंगोले

7)स्थितीक विद्युत - अंकिता जोगदंड

8)स्थितीक विद्युत किंवा घर्षण विद्युतावर आधारीत प्रयोग करणे - समीक्षा इंगोले

9)लाल रंगाच्या वनस्पतीच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण होते का?काळ्या रंगाच्या किंवा जांभल्या रंगाच्या स्केचपेंमधील शाई किती रंगणी बनवलेली आहेहे अभ्यासणे - धनश्री जोगदंड

10)रंग वाचता येतात की शब्द - पुजा शिंदे

11)पृष्टीय ताण ही संकल्पना समजून घेणे -श्वेता जोगदंड

12)अपमार्जक - अक्षदा कलंदर

13)ज्वलनास ऑक्सिजन ची गरज असते -नेहा कदम

14)कार्बन डॉय ओक्सईड वायू तयार करणे -धनश्री जोगदंड

15)विजेचे सुवाहक व दुर्वाहक -प्रथमेश जोगदंड

16)कागदी कपापासून फिरकी तयार करणे -नंदकिशोर

17)वृत्तचित्ती व शंकूच्या आकाराची तुलना करणे -दत्ता गिरी

18)हवेचे वस्तुमान वजन आणि दाब -पुष्कर हिंगोले

19)हळदीचे कुंकू व कुंकवाची हळद -सामर्थ जोगदंड

20)वृत्तचित्ती, इष्टिकाचित्ती, त्रिकोणचित्ती च्या घनफळाची तुलना करणे - श्रीवर्धन जोगदंड

21)मुलाचा अभ्यास - ओमकार अंमलगोंडे

22)मातीचे ठर अभ्यासणे - अनुष्का इंगोले

23)मॅजिक गाड्या खेळ - शंकर जोगदंड

24)चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता - दुर्गा हेसे

25)हवेला वजन असते - यश हिंगोले

26)चुंबकीय पदार्थ व अचुंबकीय पदार्थ वेगळे करणे - अक्षरात हिंगोले

27)पदार्थ्यांचे अवस्थानतर - अंजली जोगदंड

28)उष्णतेचे संक्रमण व अभिसरण - वैष्णवी जोगदंड

29)उष्णतेचे संक्रमन,घनता व अभिसरण संबंध - प्रतिज्ञा कऱ्हाळे

30)उष्ण हवा हलकी असते तसेच थंड हवा जड असते हा प्रयोग अभ्यासणे - कोमल हिंगोले

31)स्थितीक विद्युत बल - सानिका हिंगोले

32)तापमापी नोंद - अक्षरा कदम

33)तापमापीच्या साहाय्याने तापमान कसे मोजावे -दिव्या

34)द्रावणाची घनता -नंदिनी शिंदे

35)बदलत्या रंगाचे कुंकू - बंटी शिंदे

35)मॅजिक फिश पॉट - प्राची भालेराव

36)वस्तुमान आणि आकरमान -प्रीतम हिंगोले

             

शाळेच्या वतीने रत्नपारखी मॅडम आणि त्यांच्या सर्व विध्यर्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच आजचे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पांडे मॅडम,बेळगे सर,पाम्पटवार मॅडम,गंजेवार मॅडम,मोखण्डपल्ले मॅडम, कर्णेवार मॅडम,वाघमारे मॅडम, आणि सर्व विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)