विज्ञान प्रदर्शनातही जिजाऊ ज्ञानमंदिर अव्वल

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड : ( शरद जोगदंड ) :

स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालविकास सेवा केंद्र नांगेद्र मंदिर मुखेड येथील विज्ञान दिनानिमित्त दि. २६ रोजी आयोजित एकदिवसीय विज्ञान प्रदर्शनात जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूलचा आंधळ्या माणसांना रस्ता ओलांडण्यासाठी सूचनादर्शक (सिग्नल ) ( zebra crossing for blind persons ) प्रयोग मुखेड तालुक्यात दुसरा आला आहे.

      

या प्रयोगाचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा व शाळेचा गौरव करण्यात आला. बाल संस्कार केंद्राचे प्रमुख व्यंकटेश कवटीकवार, बाळू कोडगीरे, जगदीश जाजू , राजेश्वर इंगोले, अल्काताई चिद्रे, महानंदाताई शेळके, अंजलीताई मुखेडकर मान्यवरांच्या उपस्थितीत जिजाऊ ज्ञानमंदिर येथे विज्ञानदिनानिमित आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. प्रयोग सादरीकरणातील यशस्वी विद्यार्थी खंडेश्वर नकुलवाड, पवन जुन्ने, नरेंद्र इंगोले, भार्गव जोशी, विजय अकरगे तसेच मार्गदर्शक वर्गशिक्षक नागनाथ कांबळे सर, विज्ञान शिक्षक शिंदे सर, शितल जोगदंड व इंगोले मॅडम आदीसह मुख्याध्यापक जगदीप जोगदंड , पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड, संचालक ज्ञानोबा जोगदंड यांच्या उपस्थितीत देऊन गौरव करण्यात आला. 


यावेळी बालसंस्कार केंद्र प्रमुख व्यंकटेश कवटिकवार यांनी शाळेचे मनस्वी कौतुक केले. याच विज्ञान दिनानिमित्त अन्य दोन प्रयोग सादर करण्यात आले होते. त्यात इयता दुसरीचा साईनाथ रामदास पैलवाड या विद्यार्थ्याने वर्गशिक्षिका परवीन शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याची वाफ ( water vapour ) हा प्रयोग तर अर्श जावेद शेख याचा वर्गशिक्षिका वंदना वडजे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ( Air cooler ) हा प्रयोग सादर केला.  वर्गशिक्षिका सुरेखा राठोड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली  तिसरीतील श्रेया जमदाडे, तनुश्री सोनकांबळे, सिद्धार्थ कांबळे या विद्यार्थ्यांनी ( sun and the solar system ) या प्रयोगाचे सादरीकरण केले. 

जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरी मंगनाळे या विद्यार्थ्यानी ही आपल्या प्रयोगाचे यावेळी सादरीकरण केले. यावेळी विज्ञान दिनाचे औचित्य साधून थोर वैज्ञानिक सी.व्ही रमण यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगण्यात आली. सर्व यशस्वी सहभागी प्रयोगशील विद्यार्थ्यांचा शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)