दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही संदर्भ क्र.१ येथे नमूद पत्रातील वेळापत्रकानुसार सुरु असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्र.१,२,३, ४, ५ व ६ मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरु आहे.
शासन निर्णय दिनांक ०७.०४.२०२१ मधील विशेष संवर्ग-१ शिक्षकांची बदली ही विनंती बदली आहे. परंतु बदली प्रक्रिया राबविताना विशेष संवर्ग-१ मधील काही शिक्षकांनी अनावधानाने बदलीतून सूट मिळणेबाबतचा पर्याय न स्वीकारल्यामुळे असे शिक्षक अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या टप्प्यात समाविष्ट झालेले आहेत. तसेच विशेष संवर्ग-१ मधील ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत ३ वर्षापेक्षा कमी झालेली आहे, अशा शिक्षकांना बदलीतून सूट मिळणेबाबतची संधी यापूर्वी देण्यात आलेली नाही. अशा विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना सरसकट अवघड क्षेत्रात बदली करणे उचित ठरणार नाही, अशी निवेदने विविध शिक्षक संघटनांकडून शासनास प्राप्त झालेली आहेत.
त्यामुळे संदर्भ क्र. २ येथील शिफारशीस अनुसरुन शासन निर्णय दिनांक ०७.०४.२०२१ मधील १.८ नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ मधील ज्या शिक्षकांनी यापूर्वी अनावधानाने बदलीतून सूट मिळण्याचा पर्याय स्वीकारलेला नाही अशा संवर्ग-१ मधील शिक्षकांना बदलीसाठी होकार/नकार देण्याची शेवटची एकमेव संधी देण्यात देण्यात येत आहे. तसेच सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या इतर सर्व शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांचा पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात येत आहे.
उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी शासन पत्र दि.११.०२.२०२३ च्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. सदर बाब सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्यात यावी.
✳️ बदली अपडेट
संवर्ग एकच्या शिक्षकांना नकाराची संधी उपलब्ध
✳️ सद्यस्थितीत संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही संदर्भ क्र.1 येथे नमूद पत्रातील वेळापत्रकानुसार सुरु असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्र.1,2,3,4,5 व 6 मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे.
➡️ तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरु आहे.
➡️ शासन निर्णय दिनांक 7.04.2021 मधील विशेष संवर्ग-1 शिक्षकांची बदली ही विनंती बदली आहे.
➡️ परंतु बदली प्रक्रिया राबविताना विशेष संवर्ग-1 मधील काही शिक्षकांनी अनावधानाने बदलीतून सूट मिळणेबाबतचा पर्याय न स्वीकारल्यामुळे असे शिक्षक अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या टप्प्यात समाविष्ट झालेले आहेत.
➡️ तसेच विशेष संवर्ग-1 मधील ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत 3 वर्षापेक्षा कमी झालेली आहे, अशा शिक्षकांना बदलीतून सूट मिळणेबाबतची संधी यापूर्वी देण्यात आलेली नाही. अशा विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांना सरसकट अवघड क्षेत्रात बदली करणे उचित ठरणार नाही, अशी निवेदने विविध शिक्षक संघटनांकडून शासनास प्राप्त झालेली आहेत.
➡️ त्यामुळे संदर्भ क्र. 2 येथील शिफारशीस अनुसरुन शासन निर्णय दिनांक 7.04.2021 मधील 1.8 नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-1 मधील ज्या शिक्षकांनी यापूर्वी अनावधानाने बदलीतून सूट मिळण्याचा पर्याय स्वीकारलेला नाही अशा संवर्ग-1 मधील शिक्षकांना बदलीसाठी होकार/नकार देण्याची शेवटची एकमेव संधी देण्यात देण्यात येत आहे.
➡️ तसेच सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे पूर्ण झालेल्या इतर सर्व शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांचा पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात येत आहे.
➡️ उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी शासन पत्र दि.11.02.2023 च्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. सदर बाब सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्यात यावी.
✳️ सुधारित वेळापत्रकानुसार
➡️ विशेष संवर्ग-1 मधील शिक्षकांनी बदलीसाठी होकार / नकार भरणे
6/03/2023 ते 8/03/2023
➡️ शिक्षणाधिकारी यांनी अर्जांची पडताळणी करणे
9/03/2023 ते 11/03/2023
➡️ अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची यादी प्रसिध्द करणे
13/03/2023
➡️ अवघड क्षेत्रातील रिक्त जागांचे पर्याय भरणे
14/03/2023 ते 17/03/2023
➡️ अवघड क्षेत्रातील रिक्त राहिलेल्या 5 जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालविणे
18/03/2023 ते 20/03/2023
➡️ बदलीचे आदेश प्रकाशित करणे
21/03/2023
संजय नागे दर्यापूर 9767397707
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .