शिक्षणातून शारीरिक शिक्षा आणि मानसिक अवहेलना हद्दपार करा - सत्कार कार्यक्रमात पूर्व शिक्षण संचालक नांदेडे

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

      शिक्षणातून शारीरिक शिक्षा आणि विद्यार्थ्यांची मानसिक आवहेलना कायमची हद्दपार करण्याचे कळकळीचे आवाहन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे  यांनी केले आहे.  मुखेड तालुक्यातील येवती येथील ग्राम पंचायत आणि ग्रामस्थांच्या जाहीर नागरी सत्कारास उत्तर देताना पूर्व शिक्षण संचालक बोलत होते. माजी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे यांच्या अध्यक्षतेखाली हा मानपत्र प्रदान भव्य सोहळा संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून येवतिचे भूमिपुत्र  डॉ भुमे सन्मानपिठावर उपस्थित होते. 

         पूर्व शिक्षण संचालक डॉ नांदेडे यांच्या आयुष्यभराच्या शैक्षणिक , सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याला या मानपत्रद्वारे ग्राम पंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कारीत करण्यात आले. आपल्या भाषणातून डॉ नांदेडे यांनी उपस्थित युवक , ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना आजीवन शिक्षण घेण्याचा संकल्प दिला . शाळा विद्यार्थी स्नेही व्हाव्यात आणि विद्यार्थी ज्ञानस्नेही होण्याची अपेक्षा पूर्व संचालकांनी व्यक्त केली.. विद्यार्थ्यांना तर्क, अनुमान, आकलन आणि विश्लेषण क्षमताधारित प्रश्नप्रधान अध्यापन पद्धती अनुसरण्याची शिक्षकांना विनंती केली. येवती ग्राम पंचायतीचे तरुण तडफदार डॉक्टर असलेले सरपंच डॉ उमेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले.

          प्रास्ताविकात डॉ नांदेडे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात येत असल्याचे कारण सांगताना डॉ पाटील म्हणाले की गावातील युवकांना सर्वोच्च शिक्षण घेण्याची  आणि गावकऱ्यांना आजीवन ज्ञानाची साधना करण्याची प्रेरणा  मिळावी हेच डॉ नांदेडे यांच्या सत्काराचे प्रयोजन असल्याचे सांगितले.. शिक्षण संचालक डॉ नांदेडे यांना नुकतेच त्यांच्या तिसाव्या पदवीला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.  प्रारंभी सर्व प्रमुख पाहुण्यांचे  गावातून वाजत गाजत मिरवणुकीने सन्मान पिठाकडे  आणण्यात आले.. उपसरपंच बालाजी नागरगोजे आणि ग्रामविकासाधिकारी सचिन पांचाळ यांनी उपस्थित शिक्षक, सेवानिवृत्त सैनिक  आणि गावातील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांचा सत्कार केला.

        पूर्व शिक्षणाधिकारी एम डी पाटील यांनी आपल्या भाषणातून ग्रामीण भागातील जे विद्यार्थी शिष्यवृती परीक्षेत घवघवीत यश मिळवतील त्यांना आपल्या वडिलांच्या नावे  प्रत्येकी अकराशे रू पुरस्कार देण्याची घोषणा केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे यांनी ग्राम पंचायत करीत असलेल्या विकास कार्याचे कौतुक करून गाव आदर्श करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक गीतांच्या सुंदर सादरीकरणाने सारे मंत्रमुग्ध झाले. उपसरपंच बालाजी नागरगोजे यांनी आभार व्यक्त केले तर उपक्रमशील शिक्षक कोटगिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)