डोळे आल्यास काय काळजी घ्याल? | Eye care

शालेयवृत्त सेवा
0

 


सध्या सर्वत्र डोळे येण्याची साथ सुरू आहे डोळे येणे हा एक संसर्गजन्य आजार असून शालेय विद्यार्थी या मार्फत हा आजार खूप वेगाने पसरतो या आजारात काय काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन

डोळे येणे : 

डोळे आल्यास काय काळजी घ्यावी ?

- डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा.

- इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये.

- डोळ्यांना सतत स्पर्श करू नये.

- उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्यांचा वापर करावा. डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो विशेषतः पावसाळ्यात होतो. कधी दोन्ही डोळ्यांवरही त्याचा संसर्ग होतो. डोळ्यांना खाज, चिकटपणा, डोळ्यांना सूज, डोळे लालसर होणे, डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे.

- आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात.

- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी.


राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र शासन


| राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)