इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन ( IBTA ) शिष्टमंडळाने घेतली भेट !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत शिक्षक व कर्मचार्यांचे पदोन्नतीसह सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढले जातील. शिक्षक व कर्मचार्यांचे लोकोपयोगी कार्यात अधिक सजग राहून समर्पित भावनने कार्य करावे. असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या नुतन मुख्य कार्यकारी मा.मीनल करनवाल मॅडम (IAS) यांनी इब्टाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना केले.
इब्टाच्या शिष्टमंडळानीही मुकाअ यांच्या विद्यार्थी, शिक्षक व समाजोपयोगी उपक्रमात संघटनेचे पूर्ण सहकार्य राहिल असेआश्वासन दिले. संघटनेच्यावतीने नुतन मुख्य कार्यकारी मा.मीनल करनवाल मॅडम (IAS) यांचा भारतीय संविधान भेट देवून हृदय स्वागत करण्यात आले.
सदर शिष्टमंडळात इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष तथा सहकारी पतपेढीचे माजी सचिव तथा विद्यमान संचालक मा.बालासाहेब लोणे, लहानकर, सरचिटणीस मा.निलेश गोधने, फुलवळकर, समताविकास पतसंस्थेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालेक मा.रमेशराव गोवंदे, मा.नागनाथ येरमलवाड, सेवानिवृत्त राजपत्रीत मुख्याध्यापक मा.संभाजीराव वाठोरे, अराजपत्रीत मुख्याध्यापक मा.बबनराव घोडगे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर बँकेचे प्रवर्तक मा.गणपत गायकवाड, मा.जितेंद्र गवळे, पदोन्नत मुख्याध्यापक मा.कैलास पोहर, मा.बळीराम कदम, मा.अशोक पंडीत, मा.सुधीर मरवाळीकर व अन्य संघटना सहकारी यांचा समावेश होता.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .