नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मुदखेड तालुक्यातील जिजामाता प्राथमिक शाळा मुगट येथे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन केले गेले त्यामध्ये निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा समय सूचक वादविवाद स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशाच विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ठिपक्याची रांगोळी न काढता त्यांना वैज्ञानिक प्रयोगाची सुबक आकृती काढून त्यात रंग भरले या स्पर्धे अंतर्गत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना रुजवून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक माहिती देण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष श्री मारोतरावजी भंडारे तसेच उपाध्यक्ष श्री देविदास लक्ष्मण पाटील मुंगल व सचिव श्री विलासरावजी कल्याणकर यांनी विद्यार्थ्यांच्या रांगोळीचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना प्रयोगा बाबतीत प्रश्न विचारले विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली विद्यार्थ्याचे व विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक श्री देवठाणकर सर तसेच शिक्षक वृंद सौ.आर. एम.भोसले म मॅडम ,के. आर.दरबस्तवार मॅडम ,जे.व्ही.जोशी मॅडम ,के.जी.हातागळे मॅडम, श्री एस .के.भोसले सर व काचावांर सर या शिक्षक वृंदाचे भरभरून कौतुक केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .