शिक्षकांना १५ ऑगस्ट नंतरच मिळणार जीपीएफ स्लीप!

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने सातव्या आयोगाचे हफ्ते जमा न झाल्याबद्दल चौकशी करुन हफ्ते जमा करणे व जीपीएफ स्लीप तात्काळ मिळणे बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना जीपीएफ स्लीप 15 ऑगस्ट नंतरच मिळणार असल्याचे सांगितले अशी माहिती संतोष अम्बुलगेकर यांनी दिली.


                     गेल्या काही वर्षापासून ७ व्या वेतन आयोगाचे पहिला हफ्ता लोह तालुका व बिलोली तालुक्यातील कसराळी केंद्राचा जमा झालाच नाही. तर काही तालुक्यात पहिला दुसरा तर काही तालुक्यात तिसरा हफ्ता जमा झाला. ही अनियमितता का झाली? सदरील आयोगाचे बजट कुठे गेले? याबाबतची चौकशी करून हफ्ते जमा करून अचूक जीपीएफ स्लीप देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना दिले. त्यांनी 15 ऑगस्ट नंतर जीपीएफ स्लीप देण्यात येईल असे आश्वासन दिले. संबधित सातव्या वेतन आयोगाची हफ्ते अनियमितता बाबत चौकशी करण्यात येईल असेही सांगितले .

यावेळी शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, तानाजी पवार , जिल्हासरचिटणीस रवि बंडेवार , मार्गदर्शक- शिवाजी पाटील, जिल्हाउपाध्यक्ष -शेख मुस्तफा , जिल्हासंघटक - प्रकाश कांबळे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)