जिल्हा परिषद आदर्श उमरी जहागिर शाळेला शिक्षणाधिकारी श्रीमती बिरगे मॅडम यांची आकस्मिक भेट..

शालेयवृत्त सेवा
0

 


आयसीटी लॅबची केली पाहणी : कॅम्पुटर, प्रोजेक्टर आणि डिजिटल बोर्ड हे पाहून समाधान व्यक्त केले..


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद नांदेड शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती बिरगे मॅडम यांनी जिल्हा परिषद आदर्श शाळा उमरी जहागिर, केंद्र पाथरड ,विभाग आष्टी ,तालुका हादगाव, जिल्हा नांदेड या शाळेला आकस्मित भेट दिली. त्यांच्यासोबत आदर्श शाळा नांदेड जिल्हा समन्वयक श्री शिरसाट साहेब ,हादगाव तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री फोले साहेब ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री डूमणे साहेब ,श्री गुणवंत काळे साहेब उपस्थित होते.


शाळेच्या प्रांगणामध्ये प्रवेश करताच विद्यार्थी मध्यान्ह भोजन करीत होते. मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले आणि विद्यार्थ्यासोबत बसून शालेय पोषण आहार भोजनाचा आस्वाद घेतला. यानंतर शालेय पोषण आहार कक्ष हे जुन्या टाकाऊ शाळेच्या खोली वरील लोखंडी पत्र्यापासून तयार केलेल्या नवीन शेडचे रूपांतर पाहून समाधान व्यक्त केले. यानंतर बाजूची परसबाग पाहिली त्यामधील विविध झाडांची पाहणी केली 


नंतर मॅडम यांनी एपीजे अब्दुल कलाम प्रयोगशाळेला भेट दिली .प्रयोगशाळेचे विविध साहित्य पाहून समाधान व्यक्त केले. प्रयोगशाळेच्या दुर्बिणी मधून निरीक्षण करून पाहिले. सर्व साहित्य यांचा वापर करून घेण्यास सांगितले. त्यानंतर मॅडम यांनी उर्वरित शाळा खोल्या स्वच्छतागृहाची पाहणी केली शाळेला मिळालेली नवीन आयसीटी लॅब यांची पाहणी केली मिळालेली 11 कॅम्पुटर, प्रोजेक्टर आणि डिजिटल बोर्ड हे पाहून समाधान व्यक्त केले.


यानंतर आठव्या  वर्गात मॅडम यांनी प्रवेश केला .वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन मॅडमचे स्वागत केले .यानंतर आठव्या वर्गातील डिजिटल फळा श्री ओम सर यांनी त्याचे विविध उपयोग सांगितले . फळ्याचा कॅम्पुटर म्हणून उपयोग करता येतो तसेच शिकवलेला भाग सेव करता येतो आणि पुन्हा पाहता येतो. डिजिटल फळ्यामध्ये वर्ग पहिली ते दहावीपर्यंत अभ्यासक्रम सेट करून मिळालेला आहे. त्या वर्गाच्या विषयाने अभ्यासक्रम दाखवला यानंतर मॅडम यांनी डिजिटल पेनच्या साह्याने फळ्यावर मंगल कलश याची आकृती काढली. त्यामध्ये रंग भरले आणि मेरी माटी मेरा देश या चालू असलेल्या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना पंचपद आचरण्याचे आवाहन केले.


यानंतर वर्ग सातवीच्या वर्गामध्ये मॅडम यांनी प्रवेश केला सातवीच्या विद्यार्थ्यांनी मॅडम यांची परवानगी घेऊन विविध प्रश्न विचारून मुलाखत घेतली आणि मॅडम यांनी आपण एक शिक्षिका ते शिक्षण अधिकारी पदापर्यंत कसे प्रयत्न केले आणि आपल्याला कसे यश मिळत गेले यावर मनोगत व्यक्त केले. आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची अभ्यासाची गोडी लागावी याबद्दल अनमोल असा संदेश दिला.


यानंतर वर्ग सहावी मध्ये मॅडम यांनी प्रवेश केला आहे  विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सामुदायिकरित्या "या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लाऊ." हे महाराष्ट्र गीत गाऊन मॅडम यांचे स्वागत केले. तसेच शाळेतील श्री मोरे सर यांनी राबवत असलेल्या सामान्य ज्ञान या रोज चालणाऱ्या उपक्रमाचे आणि विद्यार्थ्यांनी त्याची नोंद केली त्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये प्रथम आलेली कुमारी संध्या उमरे हिचे स्वागत केले. भाषण स्पर्धेमध्ये तालुकास्तरावर राहिलेला शिवम जिंतुरे आणि चित्रकला स्पर्धेमध्ये सुंदर चित्रे काढणारा पुनर्व शिंदे या विद्यार्थ्यांचा सुद्धा मॅडम यांनी सत्कार केला. अभिनंदन केले.



कैलासवासी श्री राजारामजी शिंदे स्वातंत्र्यसैनिक उमरी जहागीर यांनी उमरी जहागीर जिल्हा परिषद  शाळेसाठी जमीन दान दिली. आणि त्यांचे वंशज यांनी ही दान केलेली भूमी रजिस्ट्री कार्यालय हादगाव येथे स्वतः येऊन शासनाच्या नावे सातबारावर नोंद करून दिली. त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने शाळेच्या प्रांगणातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रीमती बिरगे मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांनी अभिवादन केले.

शाळेच्या प्रांगणातील बोधिवृक्ष पिंपळाच्या खाली बसून सर्व शाळेचा परिसर मॅडम यांनी  बघितला. शाळेच्या  जुन्या फरश्या होत्या, जुने पत्रे, दारे खिडक्यावरील सिमेंटचे ब्लॉक, लाकडाचे सामान होते तसेच खोल्यांच्या पायाभरणी मध्ये जे दगड चिरे होते त्या सर्वांचा उपयोग पुन्हा शाळेसाठी पुनर्वापर करण्यात आल्याचे पाहून श्री अरविंद सरांचे अभिनंदन केले.


सर्व शाळा परिसर पाहून शेवटी शाळा कार्यालयामध्ये मॅडम यांनी सर्वांची बैठक घेतली आणि सर्व शिक्षकांनी एकोप्याने केलेल्या कामाचे तसेच स्वतःहून शाळेसाठी मदत करणारे शाळेला विविध वस्तू दान करणारे शिक्षक शिक्षिका सर्वांचे अभिनंदन केले. सर्वांना शुभेच्छा देत असताना आपण आपल्या स्वतःच्या मुलासाठी जे अपेक्षित करतो ते जर आपण या ठिकाणी शाळेमध्ये देत आहात हे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले . शाळेबद्दल समाधान व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)