जिजाऊ ज्ञानमंदिर शाळेची स्वातंत्र्यदिनी लक्षवेधी रॅली..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :         

मुखेड येथील जिजाऊ ज्ञानमंदिर सेमी इंग्लिश स्कूलमध्ये ७६ वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८.०५ वाजता संस्थाध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जगदीप जोगदंड, पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड, भानुदास इंगोले पाटील, दिगांबर इंगोले, प्रल्हाद इंगोले, गजानन पाटील , दत्तात्रय इंगोले, परिसरातील नागरिक पालक , शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येनी उपस्थित होते. 

दरम्यान याच दिवशी वाढदिवस आसणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस ही उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर देशभक्तीपर गीते गायल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची मुखेड शहरातील मुख्य रस्त्याने प्रभातफेरी काढण्यात आली. सोबत लेझीम पथक , भारतमाता , त्यापाठोपाठ चिमुकले भारतीय राष्ट्रीय नेत्याच्या पोशाखातील विद्यार्थी , मिल्ट्री पथक , पोलीस पथक , वृक्षदिंडी, ग्रंथदिंडी , त्यापाठोपाठ विविध घोषवाक्याचे फलक घेवून जयघोष करणारे विद्यार्थी , शेकडो तिरंगा झेंडे घेवून घोषणा देणारे विद्यार्थी असे सारे विद्यार्थी शिक्षक, शिक्षिका मोठ्या उत्साहात प्रभातफेरीत सहभागी झाले होते. रस्त्यावरील प्रेक्षकगण प्रभातफेरीचे विहंगम दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेत होते. प्रत्येकजण व्वा ! काय छान ! अशी जणू वाहवा करीत होते. 

लेझीम पथकासाठी आठ दिवसापासून मागदर्शक सौ.विजयमाला राठोड व आटाळकर सर यांनी सराव करून चांगलीच तयारी करून घेतली होती. या श्रमाचे चीज झाले. जागोजागी रॅलीचे त्यात्या प्रभागातील मान्यवरांकडून स्वागत व कौतुक झाले. मुखेड पोलीस निरीक्षकांकडूनही शाळेचे कौतुक झाले. प्रभातफेरी यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी , शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी , स्कूलबस वाहक , पालक यांनी चांगले सहकार्य केल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)