जि.प.प्रा.शा.गणेशपूर जुने शाळेत शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 जि.प.प्रा.शा.गणेशपूर जुने शाळेत शा.व्य समीतीचे पुनर्गठन करण्यात साठी गावातील जेष्ठ,प्रतिष्ठीत व्यक्ती गावातील जेष्ठ नागरिक तुकाजी आत्राम ,कुडमते ,माधव पेंदोर व चंद्रकलाबाई आडे,कुमरे , माजी शा.व्य.स.अध्यक्ष श्री.विजय मेश्राम  तसेच सर्व उपस्थित प्रतिष्ठीत नागरीक व महिला  पालक यांच्या मार्गदर्शन खाली  शालेय व्यवस्थापन समिती ची बैठक घेऊन  सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करून अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्यां ची निवड करण्यात आली. अध्यक्ष श्री.रविकांत कुमरे तर उपाध्यक्ष श्री .गणपत कोरवते यांची निवड झाली.

तसेच सर्व सदस्य विजय मेश्राम, सुनील चिक्राम, सौ.सुप्रिया पेंदोर, सरपंच अनुसया तडसे, रविता आत्राम, मारोती कोडापे, पुष्पा आत्राम, जयश्री मेश्राम, कु.वांशिक मेश्राम, रोहण आत्राम यांची  निवड करण्यात आली .सुखदेव आत्राम,सुनिल चिक्राम,भावराव तोडसाम,संतोष तोडसाम,प्रकाशआत्राम,परसराम आत्राम,संदिप गाडे ,सौ पुजा कर्हाळे,सौ.पुजा बोखारे, अंगणवाडी सेविका कल्पना बावणे ,संदिप गाडे, तसेच अनेक जण उपस्थित होते. माजी शा.व्य.स.अध्यक्ष विजय मेश्राम  व तुकाराम आत्राम यांच्ये हस्ते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे  शाल श्रीफळ व  पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .सर्वांना अल्पोपाहार व चहा दिला  .शेवटी स.शि .ऊर्मिला परभणकर यांनी  शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्याची व कर्तव्याची  थोडक्यात माहिती सांगून आभार मानले आणि बैठकीचा समारोप केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)