सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :
पुस्तकांना आपले मित्र बनवा तसेच विज्ञानाचे नवनवीन साहित्य, उपक्रम उपक्रमशील विद्यार्थी म्हणून शाळेचा व देशाचा गौरव वाढवा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हाजी मुनिरुद्दीन तथा मुन्नाभाई पटेकरी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना केले.
सरोवर शिक्षण मंडळाच्या सर्व माध्यमांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ध्वजारोहण हाजी मुनीरुद्दिन पटेकरी यांच्या हस्ते करण्यात आले,तसेच हाफिज आरिफ जब्बार शेख, हाफिज अब्दुल रौफ मोमीन, उद्योजक जब्बार बारस्कर, डॉक्टर जमीर सय्यद इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष फारुक अकीवाटे सर यांनी केले. नुकतेच निधन झालेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय हाजी मूनिरुद्दिन मुल्ला तथा माजी मुख्याध्यापिका स्वर्गीय शहेनाजबेगम मुल्ला यांना आदरांजली तथा (दुआ) करण्यात आली आणि त्यांनी शिक्षणासाठी केलेले योगदान नेहमी प्रेरणा देत राहील व त्यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आपण सर्वांवर असलचे मान्यवरांनी सांगितले.
संस्थेचे पदाधिकारी सरवर मुल्ला,हाजी हारुन रशीद मुल्ला , ताहेर मुल्ला,मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .