बाल आनंदनगरी हा जीवन शिक्षण देणारा उपक्रम - व्यंकटेश चौधरी

शालेयवृत्त सेवा
0

 



वजिराबाद मनपा शाळेत बाल आनंदनगरीचे उत्साहात आयोजन


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

चार भिंतीतील शिक्षणासोबत मुलांना भिंती पल्याड अनुभवाची आवड असते. हे अनुभव त्यांना आनंदा सोबतच जीवनातील व्यवहार शिकवतात, हेच खरे जीवन शिक्षण असते, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंग संधू यांच्या प्रेरणेतून मनपा शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे मत शिक्षणाधिकारी मनपा व्यंकटेश चौधरी यांनी केले.


       नांदेड वाघाळा शहर महापालिकेची पीएमश्री शाळा क्र.1 वजिराबाद येथे बाल आनंदनगरीचे आयोजन उत्साहामध्ये करण्यात आले. त्यावेळी त्यांनी वरील भावना व्यक्त केली. आनंदनगरीचे उदघाटन व्यंकटेश चौधरी यांनी केले. यावेळी समन्वयक संजय ढवळे, विषय तज्ञ संदीप लबडे उपस्थित होते.


       मुलांना एक वेगळा आणि नावीन्यपूर्ण अनुभव मिळून अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार शिक्षण देण्यासाठी सदर बाल आनंदनगरी महत्त्वाची होती.  विदयार्थ्यासमवेत सदर मेळाव्याचा त्यांनी आनंद घेतला. यामध्ये मुलांनी विविध खाद्य पदार्थ, खाऊ गल्ली, दहीवडा, मंच्युरीयन, भेळ, पावभाजी, शेवपुरी, शाबुदाना वडा, शेगाव पापड, आलुनरडे, मसाला चणे, पालकपुरी, जिराराईस, मंच्यरियन, फ्राईड भेंडी, आलू खिचडी इत्यादी विविध पदार्थ विद्यार्थ्यांनी आणले होते.


      मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सज्जन प्रभू, सौ. वर्षा देशमुख, केरबा मगरे, अपर्णा वडजे, विठ्ठल चांदणे, मयुर कदम, श्रीमती शुभांगी पतंगे, महेश यम्मेवार, मुरलीधर पवार, राजकुमार देवकत्ते, निखील डुकरे, या शाळेतील शिक्षकांनी बाल आनंदनगरीचे यशस्वी आयोजन केले. 


        या बालकांच्या या उपक्रमाला मनपाचे आस्थापना लिपिक साहेबराव जोंधळे, मुख्याध्यापिका रेश्मा बेगम, श्रीमती वंदना शिंदे, ज्योत्स्ना भगत, आशा घुले , रत्नमाला आलमवाड यांनी भेट देऊन कौतुक केले. सेवक सोमनाथ धनमणे, धम्मदीप खिल्लारे, पूजा गौरी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)