◾ मिनी सूर्यमाला मॉडेल - युरेनस ग्रह आणि त्याचे चंद्र
सामन्यतः भूगोल / विज्ञान पुस्तकात सूर्यमालेचे चित्र दाखवतात ज्यात सूर्य मध्यभागी आणि इतर ग्रह त्याच्या भोवती फिरतात असे दाखवले जाते.
ग्रहाच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षा दाखवण्यासाठी वर्तुळाकार रेषा दाखवल्या जातात.
प्रत्येक ग्रह हा स्वतःच्या ठरलेल्या कक्षेत सूर्याभोवती फिरत असतो.
आपण सूर्यमालेच्या आत असल्याने प्रत्यक्ष ग्रहांचे फिरणे हे आपल्याला वर्तुळाकार कक्षा न दिसता आकाशातून जाणाऱ्या ग्रहांच्या आभासी मार्गक्रमण आणि त्यानुसार घडणारे त्यांचे वक्री-मार्गी असे सापेक्ष चलन हे दिसत असते.
परंतु जर आपल्याला सूर्यमालेतील ग्रहांचे चित्रात दाखवल्या प्रमाणे वर्तुळाकार कक्षेतील चलन बघायचे झाले तर सूर्यमालेच्या 90 अंश कोनात वर किंवा खालच्या दिशेत अब्जावधी किलोमीटर जावे लागेल तेव्हा तिथून बघताना सूर्य मध्यभागी आणि इतर ग्रह त्याच्या भोवती वर्तुळाकार कक्षेत फिरत आहेत असे चित्राप्रमाणे प्रत्यक्ष दिसेल.
असे आपण सध्यातरी असणाऱ्या कोणत्याही अवकाश यानाचा वापर करून करू शकत नाहीत, परंतु जर आपण युरेनस ग्रह आणि त्याचे चंद्र यांचे दुर्बिणीतून निरीक्षण केले तर आपल्याला हे वर्तुळाकार फिरणे स्पष्ट दिसते.
युरेनस ग्रह हा सूर्यमालेत 7 व्या क्रमांकाचा ग्रह आहे.
त्याला एकूण 28 चंद्र आहेत त्यापैकी 5 मोठे चंद्र आहेत.
Miranda, Ariel, Umbriel, Titania, and Oberon हे मोठे चंद्र युरेनस भोवती फिरताना पृथ्वीवरून दुर्बिणीद्वारे बघितल्यास दिसू शकतात.
परंतु हे दृश्य हाय मॅग्निफिकेशन आणि विशेष प्रकारचा कॅमेरा असलेल्या दुर्बिणीद्वारे बघणे आवश्यक आहे कारण ते चंद्र खूप अंधुक आहेत.
जसा पृथ्वीचा स्वतः भोवती फिरण्याचा अक्ष हा सुमारे 23.5 डिग्री ने कललेला आहे तास युरेनस ग्रहाचा स्वतः भोवती फिरण्याचा अक्ष हा 98 डिग्री ने कललेला आहे.
याचा अर्थ युरेनस ग्रह हा उभा न फिरता जवळपास अडवाच फिरत आहे असे एक प्रकारे म्हणू शकतो.
त्यामुळे त्याभोवती फिरणारे चंद्र यांची कक्षा पृथ्वीच्या दिशेत लंबवत असल्याने वर सांगितलेले चंद्र युरेनस ग्रहावभोती फिरताना पूर्ण गोलाकार कक्षा वर्तुळ बनवताना दिसतात.
गुरू / शनी प्रमाणे चंद्र ग्रहाच्या समोरून / मागून जाणे असे दृश्य युरेनस ग्रहाच्या बाबतीत पृथ्वीवरून बघताना दिसत नाही.
एक प्रकारे सांगायचे तर युरेनस ग्रह म्हणजे मध्यभागी सूर्य मानला तर त्याचे चंद्र हे सूर्यमालेतील इतर ग्रह मानले जाऊ शकतात.
सूर्याभोवती जसे इतर ग्रह फिरतात तसे चित्राप्रमाणे दृश्य युरेनस ग्रहाभोवती त्याचे चंद्र फिरताना आपल्याला दुर्बिणी द्वारे बघता येऊ शकते.
ह्याला काही तासाचा कालावधी जातो आणि ग्रहाच्या जवळ असणारे चंद्र कक्षा लहान असल्याने 1 फेरी लवकर पूर्ण करताना दिसतात आणि दूरचे चंद्र 1 फेरी पूर्ण करण्या साठी काही तास घेतात.
अशा प्रकारे सूर्यमालेचे मिनी मॉडेल प्रमाणे युरेनस ग्रह आणि त्याचे चंद्र यांचे आपण निरीक्षण करू शकतो.
Stellarium स्क्रिनशॉट दाखवला आहे त्यात युरेनस ग्रह, त्याचे चंद्र आणि त्यांची फिरण्याची दिशा पिवळ्या रंगाच्या बाणाने दाखवली आहे.
खाली सूर्यमालेचे चित्र दाखवले आहे ज्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही दोन्हीची तुलना करू शकता आणि वर्तुळाकार कक्षा म्हणजे नेमकं काय हे समजू शकता.
▪️साभार : आकाशातील गमती जमती (facebook)
-----------------------------------------------
@followers माहिती आवडल्यास शेअर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .