ढग आणि संधिप्रकाश यांचा संबंध

शालेयवृत्त सेवा
0

◾ ढग आणि संधिप्रकाश यांचा संबंध 


पावसाळा सुरु होण्या आधी आणि नंतर काही दिवस संध्याकाळच्या वेळेला आणि कधी पहाटे सुद्धा आपल्याला आकाशात संधिप्रकाश पसरलेला दिसतो. 


हा प्रकाश सर्व दिशेत पसरलेल्या ढगातून एकसमान तीव्रतेचा वाटतो. 


अनेकदा हा प्रकाश हा सूर्य जिथे असतो त्याच्या उलट दिशेत असणाऱ्या ढगांवर परावर्तित होऊन ती दिशा जास्त प्रकाशमान दिसते. 


उदाहरण - सूर्यास्त पश्चिम दिशेत होऊन सुद्धा आपल्याला ढगांवरून परावर्तित होऊन येणारा संधी प्रकाश पूर्व दिशेतून येताना दिसतो. 


असे तेव्हा होते ज्या वेळी सूर्यास्त झालेला असतो आणि क्षितीजाच्या खालून सूर्य किरणे वरच्या दिशेत अपवर्तित होऊन केवळ लालसर रंगाचा प्रकाश पुढे जात ढगांवर पडतो आणि सर्व ढग एक प्रकारे LED दिव्याच्या प्लास्टिक कव्हर प्रमाणे तो लालसर प्रकाश एकसमान सर्व दिशेत पसरवतात आणि जमिनीच्या दिशेत परावर्तित करतात. 





म्हणून जमिनीवर लालसर रंगाचा संधिप्रकाश पडला असे आपण म्हणतो. 


प्रकाश परावर्तित करणारे ढग जर पूर्ण पणे पसरले असतील तर संधिप्रकाश एकसमान दिसतो. 


ढग जर केवळ एकाच भागात असतील आणि बाकी आकाश स्वच्छ असेल तर केवळ ते संधी प्रकाश पसरवणारे ढग लालसर दिसतात बाकी आकाश निळे / गडद रंगांचे दिसते. 


काही वेळा सूर्यास्त झाला त्या दिशेत गडद पावसाळी ढग जमा होतात परंतु सूर्य प्रकाश त्यांच्या वरून जाऊन पूर्व दिशेत असणाऱ्या ढगांवर पडतो आणि पूर्व दिशेत असणारे ढग चमकदार बनून लालसर संधी प्रकाश बनवतात त्यावेळी सूर्यास्त पश्चिम दिशेत होऊन सुद्धा असे वाटते की पूर्व दिशा पूर्ण उजळून निघाली आहे. 


अशा अनेक घटना वेगवेगळ्या प्रकारे संधी प्रकाश बनवतात. 

पावसाळा पूर्ण स्थिर होण्या आगोदर / नंतर आपल्याला हे दृश्य अनेकदा दिसत राहते. 



▪️साभार : आकाशातील गमती जमती (facebook Page)

----------------------------------------------

@followers माहिती आवडल्यास शेअर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)