◾ मॉन्सून भारतात आला म्हणजे नेमकं काय ?
अनेकदा आपण टीव्ही न्यूज मध्ये ऐकतो आज मॉन्सून अंदमान मध्ये आला, केरळ मध्ये आला वगैरे बातम्या देत असतात.
पण मॉन्सून आला म्हणजे काय ?
कुठून आला ?
मॉन्सून म्हणजे काय ?
हे प्रश्न तुम्हाला पडले आहेत का ?
मॉन्सून - ही हवामानाची एकत्रित अशी स्थिती आहे ज्यात हवेचा कमी दाबाचा पट्टा, सूर्याच्या उष्णतेने होणारी समुद्राच्या पाण्याची वाफ आणि ठरविक दिशेत वाहणारे वारे जे ढग समुद्रापासून भू-भागावर नेतात आणि तिथे पाऊस पडतो.
मॉन्सून येतो कुठून ?
मॉन्सून ही स्थिती आहे हे समजले.
तर असे मॉन्सून वाले हवामान पृथ्वीच्या केवळ एकाच भागावर वर्षभर असते तो भाग म्हणजे विषुववृत्त आणि त्याच्या काही अक्षांश वर आणि खालचा पूर्ण प्रदेश.
ह्याच मुळे तुम्ही बघा विषुववृत्ताच्या वर आणि खाली आपल्याला सदाहरित (नेहमी हिरवी झाडे असणारी) जंगले दिसतात. याचे हेच कारण आहे की तिथे सतत पाऊस चालूच असतो.
आपल्या कडे पाऊस हा सिझनल म्हणजे वर्षातून ठरविक वेळीच येणारा आहे, पण जेव्हा पाऊस चालू होतो ते काही महिने आपली जंगले सुद्धा हिरवी दिसू लागतात आणि नद्या, धबधबे चालू होतात.
त्यामुळे मॉन्सून हा विषुववृत्त प्रदेशावरून येतो असे म्हणता येईल.
परंतु यात "येतो" हा शब्द गती वाचक नसून स्थान वाचक आहे.
म्हणजे विषुववृत्त प्रदेशाचा मॉन्सून हा वर्षभर दोन्ही गोलार्धात 6 - 6 महिने असा झाडू सारखा फिरतो असे एक प्रकारे म्हणता येईल.
त्या काल्पनिक झाडूचा आधार विषुवृत्त आणि काड्यांचा पसारा म्हणजे आपली कर्क वृत्त (उत्तर गोलार्धात) आणि मकर वृत्त (दक्षिण गोलार्धात) असा हा मॉन्सून पसरत असतो.
हे मॉन्सून येणे जाणे म्हणजे पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्याचा अक्ष 23.5 डिग्री कललेला असल्याने आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरताना ठरविक वेळी ठरविक स्थानी पोहोचून त्यामुळे पृथ्वीचा कर्क वृत्त भाग सूर्यासमोर जास्त प्रमाणात झुकलेला असल्याने आपल्या कडे त्यावेळी मॉन्सून येतो.
ह्यावर अधिक माहिती कमेंट मधील लिंक वर वाचा.
हेच विरुद्ध बाजूला म्हणजे दक्षिण गोलार्धासाठी जेव्हा पृथ्वीचा मकरवृत्त भाग सूर्याच्या दिशेत झुकलेला असतो तेव्हा तिथे मॉन्सून सदृश्य पाऊस पडतो.
इतर वेळी त्याचे मुख्य स्थान वर सांगितल्या प्रमाणे विषुववृत्त हेच असते.
हे सर्व जरी ढोबळ मानाने सोपे वाटत असले तरी ही अतिशय गुंतागुंतीची सिस्टीम असल्याने अनेक स्थानिक हवामान पॅटर्न मॉन्सूनच्या येणे-जाणे कालावधी, तीव्रता यावर प्रभाव टाकत असतात.
हा प्रभाव कधी कमी कालावधीत जास्त पाऊस पडणे, एखादा महिना पाऊसच न पडणे, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुद्धा आपल्याकडे पाऊस पडत राहणे अशा गोष्टी घडवतो.
वर सांगितल्या प्रमाणे उत्तर भारत कर्क वृत्त जे मध्य भारतातून जाते त्याच्या वर असल्याने मॉन्सून हिमालयाच्या वर पर्यंत सर्वोच्च स्थितीत जातो आणि नंतर परत फिरतो असे म्हणता येईल.
आपल्यासाठी नैऋत्य मोसमी वारे सुरु झाले म्हणजे मॉन्सून पाऊस आला असे भूगोलाच्या पुस्तकातील सामान्य ज्ञान पुरेसे आहे.
▪️साभार : आकाशातील गंमती जमती (facebook page)
-------------------------------------------------
@followers माहिती आवडल्यास शेअर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा "शालेयवृत्त " ला लाईक फॉलो करण्यास सांगा.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .