आज आहे सर्वात मोठा दिवस
पृथ्वीचे सूर्याच्या भोवती फिरण्याने आणि पृथ्वीचा स्वतः भोवती फिरण्याचा अक्ष 23.5 अंशात झुकलेला असल्याने असे घडते. Axial tilt 23.5 degree
आज पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असताना पृथ्वीचा उत्तर गोलार्ध (म्हणजे आपण असणारा भाग) हा सूर्याच्या दिशेत सर्वात जास्त झुकलेला आहे. (चित्र बघा)
त्यामुळे आपल्या इथे आज सर्वात मोठा दिवस आहे.
अंदाजे 13 तास दिवस आणि 11 तास रात्र.
त्यामुळे आज उत्तर ध्रुवीय प्रदेश आर्क्टिक भागात 6 महिने दिवसाचा सर्वोच्च काळ असेल. Above arctic circle longest day
उत्तर गोलार्धात आज सूर्याचे सर्वोच्च स्थान कर्क वृत्त रेषेवर आहे.
इथून जशी पृथ्वी पुढे सरकेल तसा सूर्य स्थानिक आकाशात मध्यावर असताना रोज दक्षिण दिशेत जाऊ लागेल म्हणजेच दक्षिणायन सुरुवात होईल.
हेच उलट म्हणजे दक्षिण गोलार्धात (ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका यांच्यासाठी) आज सर्वात मोठी रात्र आहे.
कारण पृथ्वीचा तो भाग सूर्यापासून दूर झुकलेला आहे. (चित्र बघा)
दक्षिण गोलार्धात आज सूर्य मकर वृत्तापासून सर्वात जास्त दूर उत्तर दिशेत असेल.
त्यामुळे आज दक्षिण ध्रुवीय प्रदेश अंटार्क्टिका भागात 6 महिने रात्रीचा सर्वोच्च काळ असेल. Below antarctic circle longest night.
-----------
याचा दुसरा असा अर्थ की आर्क्टिक प्रदेशात सूर्य मावळलाच नसेल 24 तास क्षितीजाच्या वरच सर्व दिशेत फिरत असेल.
आणि अंटार्क्टिक प्रदेशात सूर्य उगवलाच नसेल, 24 तास क्षितीजाच्या खालीच फिरत असेल.
-------------
@followers माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.
( सौजन्य : आकाशातील गमती जमती )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .