चंद्रावरील पर्वत रांगा, डोंगराळ प्रदेश
Hills-mountain-regions-on-the-Moon
नासा च्या चंद्र मोहिमा सुरु होण्या आधी चंद्राच्या जमिनीची सखोल माहिती गोळा केली जाते.
त्या साठी आधी तिथे सॅटेलाईट प्रमाणे याने पाठवली जातात जी चंद्राच्या भोवती लंबवर्तुळ कक्षेत फिरत चंद्राच्या जमिनीचे हजारो, लाखो फोटो काढतात.
या फोटो चा वापर करून तिथल्या जमिनीचा डिटेल नकाशा (मॅप) बनवला जातो ज्यात जमिनीची खोली, उंच, सखल भाग, महत्वाचे प्रदेश असे सर्व हायलाईट केले जाते.
विविध टीम अनेक फोटो मॅप चा ऍनालिसिस करून मानव मिशन लँडिंग साठी योग्य जागा निवडतात आणि नंतर पुढील मिशन त्या ठिकाणी लँडिंग करण्याच्या दृष्टीने डिझाईन केली जाते.
या फोटो मध्ये चंद्रावरील Montes Carpatus प्रदेशात असणारे पर्वत आणि डोंगर रांगा दिसत आहेत.
चंद्र बनत असताना तिथे होत असणाऱ्या ज्वालामुखी प्रक्रियेतून हे डोंगर प्रदेश बनले आहेत.
यात चमकदार भाग हे उल्कापात होऊन तिथली चमकदार सिलिका खनिज माती सूर्यप्रकाशात चमकत असल्याने दिसत आहेत .
चंद्राच्या भोवती फिरणाऱ्या Lunar Reconnaissance Orbiter Camera, or LROC यानाने हे सर्व फोटो काढले आहेत.
सन 2009 पासून हे यान चंद्राच्या भोवती सॅटेलाईट प्रमाणे फिरत आहे आणि सखोल माहिती गोळा करत आहे.
भारताच्या चंद्रयान मिशन डिझाईन साठी सुद्धा या माहितीचा वापर केला गेला होता.
इसरो च्या चांद्रयान 2 मिशन चे ऑर्बिटर यान सुद्धा अशाच प्रकारे २०१९ पासून चंद्राच्या कक्षेत फिरत आहे आणि आजही काम करत आहे.
इसरो कडे सुद्धा चंद्राचे डिटेल मॅप बनवले जाण्या इतपत हजारो फोटो जमा झाले आहेत जे पब्लिक view साठी उपलब्ध असतात.
-------------
@followers माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .