या विश्वातील आपला पत्ता असा आहे. .
1] आपले नाव Name
2] गाव
3] तालुका
4] जिल्हा
5] राज्य State
6] देश Country
7] खंड Continent
8] ग्रह - पृथ्वी - मुख्य ताऱ्यापासून ३ नंबर चा ग्रह Earth
9] ग्रहमालेचे नाव - सूर्यमाला Solar system is the name of our Planetary system due to our parent star name Sun
10] ओरायन आर्म / Orion Spur (आकाशगंगेचा एक भाग जिथे आपली सूर्यमाला आहे)
11] दीर्घिका नाव - मंदाकिनी दीर्घिका / आकाशगंगा Milkyway galaxy
12] लोकल गॅलॅक्सि ग्रुप Local group of galaxies
13] व्हर्गो क्लस्टर Virgo cluster
१४] Laniakea Supercluster सुपर क्लस्टर
१५] विश्व -> 9 अब्ज वर्षानंतर पृथ्वी बनली त्यावर आपण आज अस्तित्वात आहोत
आपल्या सूर्यमालेच्या अस्तित्वाचा काळ हाच मुळात विश्वाच्या तुलनेत खूप लहान आहे,
त्यात पृथ्वी, त्यावर बनलेले देश, आता पर्यंत माहिती असलेला सर्व इतिहास आणि मग आपण जे अंदाजे 60-80 वर्षे जीवन जगतो.
यात सुद्धा आपण शांततेत न राहता आपसात भेदभाव, लढाया करत असतो केवळ या साठी की कोण या पृथ्वीवर अधिराज्य गाजवणार ?
अनेक महान शासक, योद्धे आले, गेले त्यांचे नाव इतिहास सुद्धा हळू हळू मिटवून टाकेल तर आपण सामान्य माणसांचे काय ?
एके काळी पृथ्वीवर केवळ डायनोसॉर प्राण्यांचेच राज्य होते, आज त्यांचे निशाण मातीत गाडलेल्या अवशेषात शोधावे लागतात.
पुढील हजारो वर्षात मानवाचे सुद्धा असेच प्लास्टिक ने वेढलेल्या कचरारुपी अवशेषात रूपांतर होणार, आणि भविष्यात कोणीतरी प्रगत जीव खोदकाम करताना त्याला एखादा मोबाईल फोन, प्लास्टिक च्या बाटली, पिशव्या, हाडे अशा वस्तू सापडणार ज्यावरून आज 20-21 व्या शतकात आधुनिक समजला जाणारा मानव कसा होता याचा ते लोक सुद्धा अंदाज बांधणार आणि त्यावर संशोधन करणार, जसे आज काही लोक डायनोसॉर वर संशोधन करतात तसे.
--------------
थोडक्यात सांगायचे तर विश्वाच्या घडून गेलेल्या टीव्ही सीरिअल च्या भागात आपण एक छोटासा एपिसोड सारखे आहोत ज्यात आपले पात्र / व्यक्ती म्हणून केवळ काही सेकंद पुरतेच मर्यादित आहे.
विश्व एखाद्या प्लेबॅक एपिसोड प्रमाणे चालू आहे का ? ह्या थिअरी वर वेगळी माहिती स्वतंत्र पोस्ट मध्ये बघूया.
-------------
@followers माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.
( सौजन्य : आकाशातील गमती जमती )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .