शून्यातून निर्माण झालेले विश्व | Big Bang theory

शालेयवृत्त सेवा
0

 



शून्यातून निर्माण झालेले विश्व - Big Bang theory 


मराठीत जशी म्हण आहे "शून्यातून विश्व उभे केले" - म्हणजे काही मदत नसताना सुद्धा खूप कष्ट करून मोठे यश मिळवले. 


तसेच या खऱ्या विश्वाची सुरुवात सुद्धा एका शून्यातून म्हणजे "काही नसलेल्या" बिंदू मधून झाली असे मानले जाते. 


या "काही नसलेल्या" बिंदू ला Singularity सिंग्युलॅरिटी म्हणतात ज्यात सामान्य स्थल-काल space-time हे शून्य झालेले असते. 


हाच सिंग्युलॅरिटी बिंदू concept ब्लॅक होल च्या बाबतीत सुद्धा वापरला जातो. 

यावरून आपले विश्व एका अति मोठ्या ब्लॅक होल च्या आत जन्मले आहे असा सुद्धा आता काही वैज्ञानिकांचा दावा आहे. 


---------------


तर Big bang म्हणजे मोठा स्फोट किंवा महास्फोट, यानुसार singularity सिंग्युलॅरिटी बिंदू अचानक पणे म्हणजे 0.1 मायक्रोसेकांदापेक्षा सुद्धा कमी वेळात expand झाला आणि अनेक पटीने पसरला गेला ज्यामुळे त्यात बंदिस्त असलेली सारी ऊर्जा energy trapped inside the singularity एकत्रित पणे बाहेर पडली. 


त्या ऊर्जेतून सुमारे 10 मायक्रो सेकांदात विश्वात पहिले मूलकण म्हणजे Quark क्वार्क, proton प्रोटॉन, neutron हे particles बनले. त्यावेळीचे तापमान सुमारे 200 अब्ज डिग्री सेल्सिअस इतके होते. 


त्यानंतर सुमारे 100 सेकांदात मूलकण एकत्रित येऊन सर्वात पहिले हायड्रोजन मूलद्रव्याचे अणू बनले आणि त्यांचे दोन हायड्रोजन अणू एकत्रित येऊन हेलियम मूलद्रव्ये बनण्यास सुरुवात झाली. या वेळी तापमान 1 अब्ज डिग्री सेल्सिअस इतके कमी झाले. 


याच हायड्रोजन, हेलियम मधून इतर मूलद्रव्ये बनत जाऊन त्यातून तारे आणि आकाशगंगा बनायला सुरुवात झाली. 


या सर्व नव्या बनलेल्या आकाशगंगा ज्या space-time मध्ये होत्या तो संपूर्ण space-time भाग मोठ्या प्रमाणात प्रसारण पावून आताच्या विश्वात जे आपण सर्व आकाशगंगा  एकमेकांपासून दूर जात आहेत ती स्थिती observable universe state बनली. 


विश्वाच्या या प्रकारे सिंग्युलॅरिटी बिंदू तुन अचानक पणे मोठ्या प्रमाणात प्रसरण पावण्याच्या क्रियेला ब्रिटिश वैज्ञानिक फ्रेड होईल यांनी "Big bang" हे सामान्य लोकांना समजेल असे नाव दिले. 

मोठा फटका फुटल्यावर जसा एका बिंदू पासून सर्व दिशेत दूर जाणाऱ्या ठिणग्या पसरताना दिसतात तशी विश्वाची सर्व दिशेत पसरून आकाशगंगा बनल्या असा त्याचा अर्थ आहे. 


वास्तविक विश्वातील या पहिल्या बनलेल्या आकाशगंगा primordial galaxies आपल्या दृश्य प्रकाश दुर्बीण क्षमतेच्या बाहेर पसरल्या गेल्याने आता आपण त्यांना केवळ जेम्स वेब सारख्या आधुनिक इन्फ्रारेड दुर्बिणी द्वारेच शोधू शकतो. 

primordial galaxies space-time expanded outside visible light observation limit from our position in the universe.


त्यातही आज मिळणाऱ्या distant galaxies observation limit आकाशगंगा या सुमारे 13.7 अब्ज वर्षे जुन्या म्हणजे वर सांगितलेल्या ज्ञात विश्वाच्या big bang घटनेला केवळ 650 दशलक्ष वर्षे झाल्यावर बनल्या असतील असा अंदाज आहे. 


हे समजायला थोडे कठीण आहे तरी असे म्हणू शकतो की आधुनिक दुर्बिणीतून आपण जितके अवकाशात दूर बघू तितक्या जुन्या आकाशगंगा ज्या big bang घटनेच्या सुरुवातीच्या काळात बनल्या असाव्यात.


हा सुरुवातीचा काळ म्हणजे सुद्धा काही लक्ष ते दशलक्ष वर्षे इतका मोठा असू शकतो ज्यात या पहिल्या आकाशगंगा बनल्या होत्या. (see diagram)


त्यांचा अभ्यास करून विश्वाची स्थिती आधी कशी होती हे समजते. 


-----------


big bang ही घटना विश्व निर्मितीच्या बाबतीत एकदाच घडून गेली असली तरी त्यात सुद्धा अनेक वाद alternate theories आहेत, 


काहींच्या मते big bang सारखे परंतु तुलनेने कमी तीव्रतेचे mini bang घटना आजही विश्वात सुरु आहेत ज्यांच्या मुळे विश्वात नव्या ठिकाणी आकाशगंगा बनण्याची प्रक्रिया अजून सुरु आहे. 


big bang का घडले याच्या संबंधी सुद्धा अनेक थिअरी आहेत. 


त्यात string theory वरून पुढे आलेली membrane theory प्रमाणे विश्वात membrane म्हणजे एखाद्या कापडी पडद्या प्रमाणे सर्व विश्वे आजू बाजूला अस्तित्वात होती त्यातली झालेली हालचाल ज्यामुळे दोन आजू बाजूला असणारी membrane विश्व एका बिंदू ला टकरून त्या बिंदू तुन वर सांगितल्या प्रमाणे एक नवे singularity event घडून our universe विश्व जन्माला आले आणि त्यात आपण सर्व आहोत असे म्हटले जाते. 


याच मेम्ब्रेन थिअरी नुसार सर्व विश्वे ही cosmic curtain पडद्या प्रमाणे एका space-time प्रतलावर आहेत आणि असे असंख्य प्रतल अजून वरच्या म्हणजे beyond 3-Dimentional reality च्या बाहेर असलेल्या higher dimension मध्ये अस्तित्वात आहेत जे आपण पाहू शकत नाही. 


-----------


विश्वाच्या उत्पत्ती च्या या big bang थिअरी चे पुरावे -


1] विश्व प्रसरण पावत आहे, 

2] सर्व आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात आहेत, 

3] आकाशगंगा दूर जाण्याचा आणि विश्व प्रसरण पावण्याचा वेग हा सुद्धा वाढत जात आहे. 


काही ठिकाणी विश्व इतके वेगात प्रसरण पावत आहे ज्याच्या पुढे प्रकाशाचा वेग जो आपण सर्वोच्च वेगाचे लिमिट मानतो तो सुद्धा कमी पडतो त्यामुळे अशा लिमिट च्या बाहेरील विश्व किंवा त्यातील primordial galaxiesआकाशगंगा आपल्याला आपल्या विश्वातील स्थानातून कितीही मोठे टेलिस्कोप advance बनवले तरी त्यातून सुद्धा कधीच दिसू शकणार नाहीत. 


-----------


विश्व उगमाच्या या प्रचलित अशा big bang थिअरी ला सध्या विज्ञान जगात मान्यता आहे. 


जो पर्यंत बाहेरील कोणी परग्रही त्यांचे विज्ञान आणि त्यांचे या विश्वाच्या संबंधी चे शोध आपल्याला भेटून समजावू शकत नाही तो पर्यंत तरी आपल्यासाठी 


big bang घटना हाच विश्वाचा उगम असे मानावे लागेल. 


यात "मानावे लागेल" हा शब्द पुराण कथेतील शेषशाही विष्णू च्या नाभीतून निर्माण झालेल्या ब्रह्म देवाने हे विश्व बनविले, 

त्याचा पालन करता म्हणून विष्णू आणि संहारक म्हणून शिव असे नेमले गेले

ही सुद्धा एक प्रकारची थिअरीच मानली गेली आहे असे आपण म्हणू शकतो. 




तुम्हाला या बद्दल काय वाटते ?


कमेंट करून सांगा. 

------------------

@followers

वरील माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.


( सौजन्य : आकाशातील गमती जमती )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)