पुणे: राज्यातील शाळांमध्ये स्वच्छता, हिरवळ आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने 'स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन २०२५-२६' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून शालेय शिक्षणात सकारात्मक बदल घडवून आणणे, मुलांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवणे आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवणे हा उद्देश आहे. महाराष्ट्र प्राथमिक परिषदेच्या निर्देशानुसार सर्व शाळांना या उपक्रमात सहभागी होणे बंधनकारक आहे.
काय आहे 'स्वच्छ आणि हरित विद्यालय'?
शाळांच्या स्वच्छतेचे, पर्यावरणपूरक उपक्रमांचे आणि आनंदी शालेय वातावरणाच्या निर्मितीचे मूल्यांकनाचा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम आहे.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून स्वच्छतेच्या सवयी रुजतील, पर्यावरण संरक्षणाबद्दलची जाणीव वाढेल आणि जबाबदार नागरिक घडतील.
उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये
सहा प्रमुख विषयांवर आधारित ६० प्रश्नांद्वारे शाळांचे स्वयं-मूल्यांकन
जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर निवड प्रक्रिया उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना पुरस्कार व गौरव
सर्वच शाळांना सहभाग अनिवार्य
असे आहे वेळापत्रक:
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत : १ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर
जिल्हास्तरीय निवड प्रक्रिया : १ ते ३१ ऑक्टोबर
राज्यस्तरासाठी नामांकन : ७नोव्हेंबर
राज्यस्तरीय निवड प्रक्रिया : ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर
राष्ट्रीय स्तरासाठी नामांकन : १४ डिसेंबर
राष्ट्रीय स्तरावरील अंतिम तपासणी :
१५ डिसेंबर २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२६
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .