राज्यातील ४० शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार' जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 




वर्धा ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षक ध्येय, महाराष्ट्र, मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांसाठी 'कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा'साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरील या स्पर्धेमागे शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच मुख्य उद्देश होता. शिक्षकांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली गेली आहे.


राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली.


अ) प्राथमिक गट (अंगणवाडी ते सातवी)


ब) माध्यमिक व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत)


प्राथमिक गटात २२ आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात १८  असे एकूण ४० विजेत्या शिक्षिका, शिक्षकांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र पाठविण्यात येईल.


कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार विजेते :


१.               डॉ. फकीरा भगवान राजगुरू, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा पिंप्री माळी ता. मेहकर जि. बुलढाणा


२.               डॉ. शितल विकास अजबे, स्वा. सै.  श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्यामंदिर, नंदुरबार


३.               भाऊसाहेब रंगनाथ उघडे, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा पैठण, ता. अकोले जि. अहिल्यानगर


४.               शगुफ्ता परवीन नियाझी, जी बी एम एम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट, जि. वर्धा


५.               योगेश चंद्रकांत नाचणकर (सहाय्यक शिक्षक) सह्याद्री शिक्षण संस्थेचे, गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे ता. चिपळूण जिल्हा रत्नागिरी


६.               सुनीता सुशांत सिकदार, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबटपल्ली, केंद्र सुंदरनगर पंचायत समिती मूलचेरा जिल्हा गडचिरोली


७.               डॉ. म्हातारदेव निंबराज म्हस्के अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे रेसिडेन्शिअल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अहिल्यानगर


८.               श्रीमती राखी संजय बेतवार, संजय गांधी विद्या विहार कॉन्व्हेंट जिल्हा वर्धा


९.               अविनाश अशोकराव गंजीवाले  जि. प. प्राथमिक शाळा, करजगाव केंद्र - सातरगाव ता. तिवसा जि. अमरावती


१०.         श्रीमती सीमा व्यंकटराव केंद्रे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, आमणी खुर्द, ता.महागाव जि.यवतमाळ


११.         योगेश रामनाथ खालकर, न्यू इंग्लिश स्कुल, नांदगाव, जि. नाशिक


१२.         प्रा. सौ. शुभांगी जयराज लाड शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजीनियरिंग माळेगाव (बु) तालुका बारामती, जिल्हा पुणे


१३.         नियाजुद्दीन मिनाजुद्दीन सिद्दिकी, संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट  जि. वर्धा


१४.         सौ. कोमलकांता कमलाकर बन्सोड, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, मानोरा. ता. भिवापूर, जि. नागपूर


१५.         संजय भास्कर कोंकमुट्टीवार, शिक्षक आणि मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गड अहेरी पंचायत समिती अहेरी जिल्हा गडचिरोली


१६.         जयश्री रामदासजी शेकार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा येवता केंद्र रासे गाव तालुका अचलपूर जिल्हा अमरावती


१७.         श्री गणेश नरोत्तम पाटील, पर्यवेक्षक वल्लभ विद्यामंदिर  पाडळदा ता. शहादा. जि. नंदुरबार


१८.         तुषार चंद्रकांत म्हात्रे, रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वाशी (नवी मुंबई)


१९.         शशिकला चंद्रकांत पाटील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण कोपर तालुका पनवेल जिल्हा रायगड


२०.         चंद्रशेखर संभाजी रेवतकर, इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, अल्लीपूर, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा


२१.         सौ. सुनिता संभाजी चौधरी, मनपा प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय, बनेवाडी (राहुल नगर) छ. संभाजी नगर


२२.         किरण विकास काळे, जि. प. प्राथमिक शाळा, लव्हेरी केंद्र येवली ता. भोर जि. पुणे


२३.         राजेंद्र प्रल्हाद शेळके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांडेगाव केंद्र सावरगाव हडप ता जालना जि जालना


२४.         सुशीला शिवाजी गुंड, जि. प. प्रा. शाळा कदमवस्ती (सोमठाण देश) तालुका येवला, जिल्हा नाशिक


२५.         हरिश्चंद्र देवाजी लाडे, सरस्वती विद्यालय पालांदूर चौरास, तहसील लाखनी, जिल्हा भंडारा


२६.         सविता पुंडलिकराव साटोने ब्रिलियंट स्कूल संत तुकडोजी वार्ड तुळसकर लॉन हिंगणघाट, जिल्हा वर्धा


२७.         कलशेट्टी मल्लिकार्जुन शिवलिंग  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी  तालुका लोहारा जिल्हा धाराशिव


२८.         भिकू सदानंद पांगारकर, रायगड जिल्हा परिषद शाळा रानवली मराठी ता. श्रीवर्धन जि. रायगड


२९.         डॉ. वैशाली शांताराम शिंदे, सहाय्यक शिक्षिका म्हणून कमला नेहरू कन्या विद्यालय, नंदुरबार


३०.         योगेश्वर कृष्णाजी कलोडे नवकेतन विद्यालय जामनी पो. गोजी. ता. हिंगणघाट जि. वर्धा


३१.         वंदना धर्मराज सालवटकर, शिक्षण महार्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय, हिंगणघाट, जि. वर्धा


३२.         सतीश नत्थूजी गौळकार, एस. एस. एम. विद्यालय हिंगणघाट, जि. वर्धा


३३.         धनंजय गणपतराव वांदिले,  श्री. सद्गुरू विद्यामंदिर वर्धमनेरी ता. आर्वी, जिल्हा वर्धा


३४.         सचिनकुमार जगदीशभाई पंचभाई, नेमसुशिल विद्यामंदिर तळोदा, तालुका तळोदा, जिल्हा नंदुरबार


३५.         विकास नानाजी नागरकर, भारत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय हिंगणघाट तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा


३६.         श्री. तेजराम लेखराम लंजे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनगाव,  ता. पोंभुर्ना जि. चंद्रपूर


३७.          रविंद्र भटू अहिरराव, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, नवलपूर तालुका, शहादा जिल्हा नंदुरबार


३८.         श्री. जगदिश सिताराम महाजन, प्राथमिक मुख्याध्यापक, धनाजी नाना प्राथमिक आश्रमशाळा, सत्रासेन, ता. चोपडा, जि. जळगाव


३९.         प्रवीण यादव मुंजमकर सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा बोडधा, केंद्र विसोरा, पंचायत समिती देसाईगंज, जिल्हा गडचिरोली


४०.         सौ. मेघा अनिल पाटील, श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व ए एम व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर, जिल्हा नंदुरबार यांची निवड करण्यात आली आहे.


सर्व विजेत्यांचे मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा आणि मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी, हिंगणघाट, जिल्हा वर्धा तसेच 'शिक्षक ध्येय'चे मधुकर घायदार, प्रभाकर कोळसे, वर्धा; डी. जी. पाटील, विजय अहिरे, नंदुरबार; कविता चौधरी, भाग्यश्री पवार, श्रद्धा पवार जळगाव; मंजू वानखडे, अमरावती; अशरफ आंजर्लेकर, विद्या देवळेकर, रत्नागिरी; अर्चना भरकाडे, अंजली वारकरी, अमरावती; कैलास बडगुजर, ठाणे; राजेंद्र लोखंडे, महादेव खलुळे, लातूर; कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर; खुशाल डोंगरवार, भंडारा; वसुधा नाईक, पुणे; प्रेमजीत गतीगंते, संगीता पवार, मुंबई; सविता डाखोरे, सोलापूर; संजय पवार, रायगड, दिवाकर मादेशी, गडचिरोली; सी एच बिसेन, गोंदिया यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)