प्रा.शा.शेंबोली शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप

शालेयवृत्त सेवा
0

 



मुदखेड ( शालेय वृत्तसेवा ) :

प्रा. शा. शेंबोली ता मुदखेड येथे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शासनाच्या ‘मोफत गणवेश योजने’अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना गणवेशाचे संच सरपंच नीताताई बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वितरित करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम दुबेवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच मधुकर गोवंदे, पोलीस पाटील कृष्णा पांचाळ, नरसिंग दुबेवाड, अमोल इरलेवाड उपस्थित होते शिक्षक रामकृष्ण लोखंडे यांनी सांगितले की, गणवेशामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकरूपता, शिस्त आणि शालेय जीवनावरील प्रेम वाढते. शासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवरील आर्थिक बोजा कमी झाला आहे.


गणवेश वाटपाच्या कार्यक्रमात केंद्रप्रमुख अरुण अतनुरे, मुख्याध्यापक चंपत मुनेश्वर,  शिक्षक रामकृष्ण लोखंडे, मंगला महाजन, सुनीता केंद्रे, छाया माठदेवरू,संगीता वादळे, जयश्री गायकवाड शालेय पोषण आहार मदतनीस गोविंद गोरेवाड, शोभा गोरेवाड विद्यार्थी आणि पालक  उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन गणवेश मिळाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण लोखंडे केले तर आभार प्रदर्शन अरुण अतनुरे यांनी मानले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शैक्षणिक वर्षाची सुरुवात अधिक उत्साहीपणे झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)