इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधून दिसणारे पृथ्वीचे दृश्य
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 420 किमी उंचीवरून सतत पृथ्वीभोवती फिरत आहे.
तिथून पूर्ण पृथ्वी गोलाकार दिसत नाही, केवळ अशा प्रकारे पृथ्वीचा ठराविक भागच दृष्टी क्षेपात राहतो.
जसे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पुढे जात राहते तसे हे दृश्य सतत बदलत असते.
नासा च्या युट्युब लाईव्ह वर तुम्ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आता कसे दिसत आहे / त्याखाली पृथ्वीचा कोणता भाग चालला आहे हे बघू शकता.
त्याची लिंक कमेंट मध्ये बघा.
इथे जो फोटो दिसत आहे तो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधून काढला आहे ज्यात आपल्याला खालील प्रमाणे गोष्टी दिसतात.
1] अवकाश - Space
सूर्य दिसत असला तरी बाहेर वातावरण नसल्याने सतत अंधारच दिसत असतो आणि केवळ पृथ्वीचा दिवस असणारा (थेट सूर्यप्रकाश पडलेला भागच दिसतो)
2] वातावरणाचा थर - Atmospheric layer
पृथ्वीचे वातावरण जे सुमारे 100 किमी उंची पर्यंत विरळ होत जाते त्याला 420 किमी उंचीवरून खाली बघताना असे दिसते.
निळ्या रंगाचा वातावरणाचा थर जमीन / अवकाश या भागांच्या मध्ये दिसतो.
सूर्याचा कोन आणि स्पेस स्टेशन ची दिशा या प्रमाणे वातावरण काही प्रमाणात कमी जास्त ठळक दिसते.
सूर्य जेव्हा थेट पृथ्वीच्या पाठीमागे असतो आणि स्पेस स्टेशन जेव्हा त्या दिशेत जाते त्यावेळी सूर्योदय होताना वातावरण स्पष्ट पणे वेगळे दिसते.
3] समुद्राचे पाणी Ocean water
पृथ्वीचा 71% भाग समुद्र आणि 29% भाग जमिनीचा असल्याने जास्त काळ स्पेस स्टेशनच्या खिडकीतून पृथ्वी बघताना समुद्र , महासागर हेच दृश्य दिसते.
यात समुद्राच्या खोली प्रमाणे निळा रंग कमी जास्त बदल होताना दिसतो.
खोल समुद्र गडद निळा दिसतो आणि उथळ समुद्र / खाडी प्रदेश हलका निळा दिसतो.
4] ढग / वादळे - Clouds / Thunderstorms
सर्वात महत्वाचे आणि जास्त प्रमाणात दिसणारी गोष्ट म्हणजे पृथ्वीवर सतत चालू असणारी वादळे आणि ढग.
आपण ज्यांना पावसाळी ढग म्हणतो ते अवकाशातून बघताना पांढरेच दिसतात कारण त्यावर थेट सूर्यप्रकाश पडून अवकाशाच्या दिशेत परावर्तित होतो.
असे ढग शेकडो किलोमीटर लांब पसरलेले असू शकतात.
एक प्रकारे त्यांची भिंत / पर्वतरांग सारखी दिसते.
सूर्यप्रकाश तिरप्या कोनात आल्यास ढंगाच्या कमी अधिक उंची नुसार बनलेल्या गडद आणि टोकदार सावल्यांची सुद्धा वेगळी समांतर रांग दिसू शकते. (फोटो बघा)
रात्रीच्या वेळी अशा ढगांतून वीज चमकलेल्या सुद्धा अनेकदा दिसतात.
-----------
सध्या इसरो तर्फे स्पेस स्टेशन वर गेलेले भारतीय कॅप्टन शुभांषु शुक्ला यांना अशा प्रकारचे पृथ्वीचे दृश्य दिसत असेल.
-------------
@followers माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .