जवळाच्या जि. प. शाळेत जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शूर आदिवासी समुदायाच्या अमूल्य योगदानाचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आणि भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी १५ नोव्हेंबर रोजी जनजाती गौरव दिवस साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जननायक बिरसा मंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षिका संगिता बडवणे, सहशिक्षक संतोष घटकार, हैदर शेख, हरिदास पांचाळ, मनिषा गच्चे आदींची उपस्थिती होती. 


            आदिवासी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी सरकारने २०२१ मध्ये जनजातिय गौरव दिवसाची घोषणा केली. भारतातील आदिवासी समुदायांच्या अमूल्य योगदानाची दखल घेण्यासाठी हा दिवस आता देशभर साजरा केला जातो. तरुण पिढ्यांमध्ये धैर्य निर्माण करण्यासाठी, शिकवणींचे पालन करण्यासाठी आणि देशभक्तीचे धडे घेण्यासाठी गौरवशाली इतिहास लिहिणाऱ्या भारतातील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. देशभरातील शाळांना जनजाती समुदायांसमोरील ऐतिहासिक आणि सामाजिक-सांस्कृतिक आव्हानांबद्दल विद्यार्थ्यांचे आकलन वाढविण्यासाठी आकर्षक उपक्रमांच्या मालिकेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. 



      कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच शाळेत उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थींनीनी प्रतिमेला अभिवादन केले. यावेळी बोलताना ढवळे म्हणाले की, आजचा उत्सव हा देशव्यापी आहे. हा उत्सव भारताच्या समृद्ध आदिवासी वारशाचा आणि आदिवासी समुदायांच्या योगदानाचा सन्मान करणारा असून भावी पिढ्यांना त्यांच्या बलिदानाबाबत महती सांगणारा आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या सांस्कृतिक पद्धती आणि कलात्मक अभिव्यक्तींचे जतन करण्यास प्रोत्साहित करणारा आहे. आदिवासी समुदायांनी आयोजित केलेल्या क्रांतिकारी चळवळी आणि संघर्ष त्यांच्या अफाट धैर्याने आणि सर्वोच्च बलिदानाने चिन्हांकित होते. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीविरुद्ध देशातील विविध प्रदेशातील आदिवासी चळवळी राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यात सामील झाल्या आणि देशभरातील भारतीयांना प्रेरणा दिली, असेही ते म्हणाले. वंदे मातरम् या गिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)