धुळे ( शालेय वृत्तसेवा ) :
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाची धुरा सांभाळणारी एस सी इ आर टी महाराष्ट्र पुणे ही राज्यस्तरीय शिखर संस्था असा नावलौकिक म्हणून असून या संस्थेच्या आजवरच्या भरीव कामगिरीमुळे महाराष्ट्र हे राज्य शिक्षण क्षेत्रात देशात अग्रेसर राहिले आहे. भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी श्री राहुल रेखावार हे या संस्थेचे विद्यमान संचालक असून त्यांच्या कुशल नेतृत्वात व मार्गदर्शनात एससीइआरटीची यशस्वी वाटचाल सुरू असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये राज्यातील प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत सूत्रबद्ध नियोजन सह तालुका , विभाग ते थेट राज्यस्तरापर्यंत सुमारे 40 चाळीस हुन अधिक विविध कला क्रीडा व कर्मचाऱ्यांच्या मुक्त अभिव्यक्तीस वाव असणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत विशेष नैपुण्य संपादन असणाऱ्या गुणवंत कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरवले जाणार आहे.
एस सी इ आर टी पुणे द्वारा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धुळे,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद धुळे, पंचायत समिती गटसाधन केंद्र साक्री तालुका साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी योगासन , लोक नृत्य , रांगोळी, वकृत्व , संगीत वादन व कथाकथन , वाद विवाद , नाट्य नाटक भूमिका मुकअभिनय , समूह गायन , सुगम गायन आदी पवित्र प्रकारच्या खुल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. या तालुकास्तरीय स्पर्धेतून थेट विभागीय स्तरावर पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून पुढील स्पर्धांचे आयोजन नाशिक येथे होणार आहे.
स्पर्धेच्या सुरुवातीला उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती चे गटविकास अधिकारी श्री शशिकांत सोनवणे यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन केले व पुष्पहार वाहून अभिवादन केले तसेच गट शिक्षणाधिकारी श्री राजेंद्र पगारे यांनी आपल्या प्रास्ताविकात जनजाती गौरव दिनाची माहिती तसेच कला क्रीडा स्पर्धा आयोजनाची NEP 2020 द्वारे अभिप्रेत असलेली स्पर्धा आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली व स्पर्धेत सहभागी शिक्षिका शिक्षक यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या सुरुवातीला गटशिक्षणाधिकारी श्री राजेंद्र पगारे यांच्या शुभहस्ते आसनांचा ड्रॉ काढण्यात आला. योगासन स्पर्धेमध्ये अनिवार्य तीन व ऐच्छिक दोन अशा प्रकारचे योगासने करण्यात आली. वरील सर्व स्पर्धा प्रकारा पैकी योगासन या क्रीडा प्रकारात धनेर बीट अंतर्गत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व महर्षी पंतजली राज्य स्तरीय योग पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक निलेश ठोके यांनी पुरुष गटामध्ये धुळे जिल्हा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. याद्वारे श्री ठोके यांची आगामी विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
योगासन स्पर्धेसाठी केंद्रप्रमुख योगेश निकवाडे,दत्तू लोंढे, सुनील जाधव, सुहाग सोनवणे, बा वि बडे ,यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले तसेच रांगोळी, सुगम संगीत गायन ,कथाकथन आदी विविध स्पर्धांसाठी केंद्रप्रमुख श्रीमती पाटील, श्रीमती मनीषा चव्हाण ,श्रीमती पियुषा पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. गटसमन्वयक श्री उज्वल भामरे यांनी स्पर्धा आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. प्राथमिक व माध्यमिक स्तरावर शिक्षकांच्या अंगी असलेले कला कौशल्य गुण वृद्धिंगत विकसित होऊन त्यांच्या मुक्त अभिव्यक्तीस वाव मिळावा,आरोग्यात सकारात्मक सुधारणा होऊन त्यांच्यातील कला- कौशल्य विषयी गुणवत्ता वाढीस लागावी त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी अधिक चांगल्या प्रकारे पार पाडली जाईल अशा उद्देशाने या स्पर्धेचे संपूर्ण राज्यात एकाचवेळी सूत्रबद्ध नियोजन करून त्रिस्तरीय पातळीवर आयोजन करण्यात येत असल्याचे कळविले आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .