बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे स्पर्धेला सुरुवात
मुंबई ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेची सुरुवात शुक्रवारपासून झाली असून, मुंबई विभागात तब्बल तीस हजार विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होत आहेत.
इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थी या स्पर्धेसाठी पात्र असतात. विज्ञानाची आवड, प्रयोगशीलता आणि विचारक्षमता वाढविणे हा यामागचा १० टक्के विद्यार्थी अंतिम टप्यात पोहोचून यश संपादन करतात. मुख्य उद्देश आहे. बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ गेली ४४ वर्षे ही स्पर्धा घेत असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञानाची जाण करून देत आहे. पहिल्या फेरीत लेखी परीक्षा घेऊन साडेसात टक्के विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या विद्यार्थ्यांना पुढील प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेसाठी बोलावले जाते. गुणवत्ता मिळवणाऱ्यांना प्रमाणपत्र, तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विशेष प्रशस्तिपत्र दिले जाते. प्रात्यक्षिक फेरीतील १० टक्के विद्यार्थी अंतिम टप्प्यात पोहोचतात. गुणवंतांना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकांनी गौरविले जाते.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी हा उपक्रम ४५ वर्षांपासून राबविला जात आहे.
-अच्युतराव माने, बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ
निकाल ७ फेब्रुवारीला :
यावर्षीचा पहिला टप्पा ८ नोव्हेंबर २०२५ रोजी, तर दुसरा टप्पा सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४ जानेवारी आणि नववीसाठी १८ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. प्रात्यक्षिक फेरीचा निकाल ७फेब्रुवारी २०२६ मध्ये लागणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .