श्रीमती बिना पाठक यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी गरजूंना दिली उबदार भेट

शालेयवृत्त सेवा
0

 



औपचारिक पणे जयंती साजरी न करता – सेवेतून आदरांजली अर्पण


जालना ( शालेय वृत्तसेवा ) :

श्री सरस्वती भुवन प्रशालामधील वर्ग शिक्षिका श्रीमती बिना बाळकृष्ण पाठक यांनी थोर समाजसुधारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना एक अर्थपूर्ण आणि संवेदनादायी आवाहन केले. जयंती केवळ औपचारिक पद्धतीने न साजरी करता, सेवाभावातून आदरांजली अर्पण करण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. समाजातील गरीब व गरजू व्यक्तींना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी ब्लॅंकेट, स्वेटर आणि कापडाच्या पिशव्या देण्याचे आवाहन त्यांनी केले.


या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी मनापासून प्रतिसाद दिला. स्वतःहून वस्तू गोळा करून त्यांनी त्या गरजूंना भेट दिल्या. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उबदार भेटी मिळवल्यावर अनेकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.


श्रीमती पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानवतेची जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि सेवा वृत्ती बळकट झाली. बिरसा मुंडा यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून सलाम करण्याचा हा उपक्रम प्रशालेच्या सामाजिक कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण ठरला. मुख्याध्यापक श्री एम एस बिराहारे यांनी शिक्षिका श्रीमती बिना पाठक व विद्यार्थ्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)