शाळा सकाळ सत्रात भरविण्यासाठी म.रा.शिक्षक परिषदेच्या मागणीला अखेर यश...!!!

शालेयवृत्त सेवा
0

 


             

नांदेड / माहूर ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मागणीला अखेर यश मिळाले असून उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळा दि.06/03/2026 पासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक  यांनी दि.05/03/2026 रोजी निर्गमित केले आहेत. 


                जिल्हा परिषद नांदेड च्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाने यांना मागील काही दिवसांपासून संघटना पातळीवरुन विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने विवीध संघटनांसह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सक्रीय संवाद करत होते.काल दि.05/03/26 रोजी मा.शिक्षणाधिकारी यांना चर्चेअंती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने रितसर निवेदन दिले.त्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे.व शाळा सकाळ सत्रात स.08:30 ते दु.01:00 वाजेपर्यंत असेल असे निर्गमित केले आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माहुर तालुकाध्यक्ष शेषराव पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी दिली आहे. व शिक्षण विभागाचे आभार मानले.


            प्रामुख्याने उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत तसेच हा जिल्हा उष्णतेच्या दृष्टीने अधिक तप्त असल्याने शिवाय कोणताही अनुचित आरोग्य विघातक प्रकार घडू नये यासाठी शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी निर्गमित केलेल्या या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक,विद्यार्थी पालक यांनी स्वागत  केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)