शिक्षक पात्रता परीक्षेबाबत शासन लवकरच पुनर्विचार याचिका दाखल करणार ना. पंकज भोयर
श्रीक्षेत्र पंढरपूर ( शालेय वृत्तसेवा ) :
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांचा दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग दि. २१ व २२ मार्च रोजी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे उत्साहात संपन्न झाला.
या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन शालेय शिक्षण, गृह व सहकार राज्यमंत्री मा. ना. पंकज भोयर यांनी आभासी पद्धतीने केले. राष्ट्रीय उपाध्यक्ष भिखाभाई पटेल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमास शेषाद्री अण्णा डांगे, डॉ. कैलास करांडे, डॉ. बी. पी. रोंगे, प्रा. डॉ. प्रदीप खेडकर, प्रा. डॉ. शेखर चंद्रात्रे व प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे उपस्थित होते. शासन शिक्षक पात्रता परीक्षा (TET) बाबत लवकरच मा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रशिक्षण वर्गातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिले
महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांतील सुमारे ३५० कार्यकर्त्यांनी या प्रशिक्षण वर्गात सहभाग नोंदवला. दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षण वर्गात एकूण सात सत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ‘एनईपी २०२०’, त्याची अंमलबजावणी व शिक्षकांची भूमिका, ‘विमर्श’, संघटन कार्य, तसेच ‘AI आणि भविष्यातील शिक्षण’ व ‘पंच परिवर्तन दायित्व बोध’ या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रांमध्ये शेषाद्री डांगे, सचिन लादे , भिखाभाई पटेल, संदीप सावेकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय सचिव प्रा. डॉ. प्रदीप खेडकर यांनी समारोपप्रसंगी या प्रशिक्षण वर्गातून शिक्षक परिषदेच्या संघटनात्मक विस्तारात आमूलाग्र बदल घडून येईल, असा विश्वास व्यक्त केला. पंढरपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार समाधान आवताडे यांनी समारोप कार्यक्रमास उपस्थित राहून ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराने कार्य करणाऱ्या शिक्षक परिषदेच्या कार्यास शुभेच्छा देत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले.
या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे, कार्यवाह पुरुषोत्तम काळे, कोषाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार, संघटन मंत्री सुरेश दंडवते, प्रांत प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे, कार्याध्यक्ष मच्छिंद्र गुरमे, रमेश क्षीरसागर, किरण कुंभार, सहकार्यवाह राकेश आव्हाड, किशोर पिसे, नितीन पवार, उपाध्यक्ष डॉ. अवधूत वानखेडे, महिला आघाडी प्रमुख वैशाली काकडे, सहप्रमुख सुरेखा ताजवे, मराठवाडा विभाग अध्यक्ष संजय कोठाळे, नाशिक विभाग अध्यक्ष रामकृष्ण बागल, नागपूर विभाग कार्यवाह विजय साळवे, डॉ. सचिन लादे , सुनील जगताप आबा देवकुळे व रामेश्वर कोरे यांनी परिश्रम घेतले. नांदेड जिल्ह्यातून सर्वात जास्त १३०कार्यकर्त्यांनी ह्या प्रशिक्षण वर्गात पूर्ण वेळ उपस्थिती दिली असून कार्यकर्त्यांना उत्साह व ऊर्जा प्राप्त झाली असून संघटनेची कार्यपद्धती, अनुशासन वैचारिक अधिष्ठान यावर विश्वास ठेवून अनेक संघटनांचे पदाधिकारी यांनी शिक्षक परिषदेत प्रवेश घेतला.बाबींचा जवळून परिचय झाल्याने संघटन वाढीसाठी निश्चित याचा उपयोग होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
या प्रशिक्षण शिबिरास विभागीय कार्याध्यक्ष बालाजी बामणे, विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील माळेगावकर जिल्हा नेते अशोक पाटील बावणे, दिगंबर पाटील कुरे, संभाजी आलेवाड , शिक्षक परिषदेचे माध्यमिक जिल्हाध्यक्ष डॉ वैजनाथ हंगरगे, केंद्रप्रमुख जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव आचणे, जेष्ठ सल्लागार वैजनाथ भिसे , चंद्रकांत गोंड, ज्ञानेश्वर घोडके, पद्माकर कुलकर्णी ,जिल्हा कोषाध्यक्ष धोंडीबा पांडागळे, जिल्हा कार्यालयीन सचिव बळवंत मंगनाळे, जिल्हा प्रवक्ते रवि ढगे, जिल्हा संघटन मंत्री संतोष साखरे,संजय मोरे, जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्ष बालाजी पांपटवार, गंगाधर तोडे, सतिष पाटील सांगवीकर,अशोक पाटील सुकनुरकर शिवराज साधू,जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिथुन मंडल्लेवार, जिल्हा संपर्क प्रमुख विश्वनाथ पाटील, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख महेश पाटील थडीसावळीकर, विठ्ठल मुखेडकर यासह असंख्य जिल्हा पदाधिकारी व तालुका अध्यक्ष उपस्थित होते.



आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .