चक्रवर्ती सम्राट प्रियदर्शी अशोक..

शालेयवृत्त सेवा
0

 



चक्रवर्ती सम्राट प्रियदर्शी अशोक.. 

        

        चक्रवर्ती सम्राट (चक्रवर्ती  सम्राट म्हणजे राजांचाही राजा) प्रियदर्शी सम्राट अशोक हा मौर्य साम्राजाचा संस्थापक सम्राट पहिल्या चंद्रगुप्त मौर्याचा नातू व सम्राट बिंबीसार मौर्याचा मुलगा. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या राज्याचा साम्राज्यविस्तार संपूर्ण आशिया खंडावर व आशिया खंडाबाहेर म्हणजे आजच्या संपूर्ण भारत देश, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका, भूतान, इराण, तुर्कस्तान ताजिकिस्तान, उझबेकिस्तान अशा आजच्या भारताबाहेरील संपूर्ण आशिया खंडांतर्गत बहुतेक प्रदेशावर सम्राट अशोक यांची सत्ता होती.


          प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी आपल्या उभ्या आयुष्यात जागतीक दर्जाचे एकही युद्ध कधीच हरलेला नाही. सम्राट अशोक यांनी सर्वात मोठे कलिंग युध्द जिंकले त्यात दोन्हीकडील मिळून 1 लाख सैन्य मृत्युमुखी पडले तर 1 लाख 50 हजार सैन्य जख्मी तर एवढेच दिड लाख लोक राजकीयबंदी करण्यात आले.


           सम्राट अशोक कलिंगयुद्धाच्या दोन वर्षापूर्वीपासुन तथागत गौतम बुद्धांच्या मानवतादी बौध्द धम्माकडे आर्कर्षित झालेले होते. परंतू कलिंगयुध्दाच्या अमानुष नरसंहानंतर सम्राट अशोकांचे संपूर्ण परिवर्तन झाले. त्यांनी स्वतःसह संपूर्ण राजघराणे व सर्व रयतेसह अहिंसा, मानवतावादी, विज्ञानवादी व लोककल्याणकारी बौध्द धम्माचा अधिकृत स्विकार केला व संपूर्ण मौर्य साम्राज्याचा बौध्द हा राजधर्म म्हणून घोषित केला.


         प्रियदर्शी सम्राट अशोकांनी आपल्या साम्राज्यभर बौद्धस्तूप, शिलालेख, अशोकस्तंभाची स्थापना केली. मनुष्य व प्राण्यांसाठी पाणवठे, तळे, अन्नछत्रे, प्रवासी निवारे, बांधले, वृक्ष लागवड केली, नाल्या रस्ते व राजमार्ग बांधले. रस्तोरस्ती विहीरी खोदल्या, स्तूप, विहारे, भव्यदिव्य बुध्द लेण्या व शिलालेख कोरले.


       सम्राट अशोकाने बौध्द धम्माचा जगभर प्रसार अन प्रचार करण्यासाठी स्वतःचा मुलगा राजपूत्र महेंद्र व मुलगी राजकन्या संघमित्रा यांना जगभर पाठविले. सम्राट अशोकांनी जगभर बौध्द धम्माच्या प्रसार अन प्रसारासाठी अनेक जागतिक धम्म परिषदांचे आयोजन केले. तथागत गौतम बुद्धांचे अहिंसा, मानवतावादी व विज्ञानवादी विचार  व सम्राट अशोकांच्या बौध्द धम्म प्रसारामुळे बौद्ध जगभर विस्तारला. खिश्चन, मुस्लिम व बौध्द जगातले सर्वाधिक अनुयायी असलेले तीन मुख्य धर्म असुन आज जगभर बौद्ध धम्म सदैव जगातल्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सदैव दुसऱ्या वा तिसऱ्या क्रमांकाचा धर्म राहत आलेला आहे.


         सम्राट अशोकाच्या साम्राज्यात सर्व प्रजा सुखी व समृध्द होती. सम्राट अशोक यांच्या या मौर्य साम्राज्याला "सोनेकी चिडीयाँ" म्हटले जायचे व सम्राट अशोकांच्या साम्राज्यात सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जाते.


        चक्रवर्ती सम्राट अशोक जगाच्या पाठीवर कोणीही होऊ शकला नाही. कुशल प्रशासक, प्रेम, सहिष्णूता, सत्य, अहिंसा एवं शाकाहारी जीवनप्रणालीचे सच्चे समर्थक होते. चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी आपल्या कार्यकालात  23 आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालयांची स्थापना केली त्यात प्रामुख्यांने तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, कंदाहार आदी विश्वविद्यालय जगभर प्रसिध्द होते. सम्राट अशोकांच्या काळात हजारो परदेशी विद्यार्थी या विश्वविद्यालयात निवासी शिक्षण घेत होते.


       भारताची चार सिंहाकृती राजमुद्रा,अशोकस्तंभ, राष्ट्रीय घोषवाक्य सत्यमेव जयते, अशोकचक्र व सारनाथ, सांची बौद्ध स्तूप, बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिद वाक्य व जगभरातील बुद्ध लेण्या व शिलालेख सम्राट अशोकांचीच जगाला देण आहे. बुद्ध लेण्या व शिलालेख इतक्या वर्षानंतरही जगभर हे अस्सल ऐताहासिक पुरावे आधुनिक जगाला सम्राट अशोकांच्या कर्तृत्व व दातृत्वाची साक्ष देत असतात. भारतीय सैन्यातील अत्योच्च पराक्रमासाठी सम्राट अशोकाच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष म्हणून परमविर अशोकचक्र सन्मान (पुरस्कार) दिला जातो.


        कलिंग युध्दाच्या विजयानंतर दहाव्या दिवशी म्हणजे दशमीला सम्राट अशोकांनी तथागत बुध्दांच्या चार आर्य सत्य व दश आर्य ( दहा पारमिता) याचा अंगीकार केला. दश आर्य अंगीकारण महोत्सवाचे पूढे अपभ्रंस होत होत दशहरा,दसरा असे होत गेले.  सम्राट अशोकांच्या संपूर्ण साम्राज्यभर बुद्ध धम्म अंगिरकारलेल्या कलिंग विजयानंतरच्या दशमीला म्हणजे अशोक विजयादशमीला मोठा उत्सव साजरा केला जात असे. या दशमीला दरवर्षी त्यास आज या दिवसाला अशोक विजयादशमी किंवा दसरा असे म्हटले जाते.


        भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही सम्राट अशोकाच्या धम्म अंगीकारण्याच्या ऐताहासिक दशमी, अशोक विजयादशमी दिनी किंवा दश आर्य (दहा पारमिता पालन) दसऱ्याच्या दिवशीच म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूरच्या ऐताहासिक दिक्षाभूमीवर धर्मांतर केले व बौध्द धम्माचे हे धम्मचक्र पुन्हा वेगाने प्रवर्तीत केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तारखेवर नाहीतर या ऐताहासिक पाश्र्वभूमीवर धर्मांतर केले होते. म्हणूनच दरवर्षी तारखेवर नाही तर चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरांच्या ऐताहासिक पाश्र्वभूमीवर दरवर्षी सम्राट अशोक विजयादशमी, दसरा दिनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा साजरा करतो.




       आपणां सर्वांना प्रियदर्शी सम्राट अशोक जयंतीच्या खूप खूप मंगल कामना. भवतू सब्ब मंगलम. सर्वांचे कल्याण होवो. !


   - बालासाहेब लोणे, नांदेड

      ( संवाद : 9421756489 )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)