राष्ट्रहिताबरोबरच शिक्षक हितासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारी ए बी आर एस एम संलग्नित शिक्षक परिषद शिक्षकांच्या प्रश्नासाठी मंत्रालयात दाखल
मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :
मा. डॉ. निरुपमा डांगे सो., संचालक, जनगणना कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मा. के. सचिन, मिटकाय एस.सी., सहाय्यक संचालक, जनगणना कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, बेलार्ड इस्टेट कोर्ट, मुंबई यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांच्या शिष्टमंडळाने प्रांताध्यक्ष मा. मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली.
यावेळी सध्या सुरू असलेल्या जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यात नियुक्त करण्यात आलेल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसह इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
1️⃣ सुरक्षा विमा कवच लागू करावे :
जनगणना कार्यात नियुक्त सर्व प्रगणक, पर्यवेक्षक व मास्टर ट्रेनर यांना सध्या राज्यात असलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.
2️⃣ एका प्रगणकास एकच HLB गट द्यावा :
सध्या अनेक प्रगणकांना दोन HLB गटांचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. अशा प्रगणकांना तात्काळ दुसरा प्रगणक उपलब्ध करून द्यावा किंवा पर्यायाने दुप्पट मानधन देण्यात यावे.
3️⃣ शिक्षकांची नियुक्ती मूळ शाळेच्या परिसरात करावी :
प्रगणक म्हणून नियुक्त शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेच्या ठिकाणीच नेमणूक देण्यात यावी. अन्य ठिकाणी नेमणूक दिल्यास प्रवास, वेळ व इतर प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहेत.
4️⃣ दर्जेदार साहित्य व स्मार्टफोन उपलब्ध करून द्यावेत :
निवडणूक कार्याप्रमाणे जनगणना कार्यासाठीही दर्जेदार साहित्य उपलब्ध करून द्यावे. तसेच प्रत्येक प्रगणकाला स्मार्टफोन उपलब्ध करून देऊन काम पूर्ण झाल्यानंतर ते परत घेण्यात यावेत.
5️⃣ मानधनात वाढ करावी :
जनगणना कार्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवून 50 हजार रुपये करण्यात यावे.
या शिष्टमंडळात मराठवाडा विभाग अध्यक्ष संजय कोठाळे, कोकण विभाग अध्यक्ष गणेश पोतदार, ठाणे जिल्हाध्यक्ष अंकुश माळी, जिल्हा कार्यवाह संजीव अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .