( शिक्षण आयुक्त कार्याल्य पुणे येथे शिक्षण आयुक्त यांच्यासोबत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करतांना पदवीधरमतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यावेळी उपस्थित शिक्षण संचालक महेश पालकर शिक्षण संचालक शरद गोसावी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे,जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर व इतर पदाधिकारी )
राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनाने शिक्षण आयुक्तांना दिले निवेदन !
पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक व राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक याच्या प्रलंबित प्रश्नावर नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह यांच्या सोबत चर्चा करण्यात आली .यावेळी शिक्षण संचालक (माध्यमिक ) महेश पालकर शिक्षण संचालक( प्राथमिक ) शरद गोसावी यासह राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यासंघटनेचे राज्याध्यक्ष व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष जिरवणकर यासह इतर संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील दिनांक 21मे 2026रोजी शिक्षण आयुक्त कार्याल्य पुणे येथे बैठक आयोजित करण्याबाबत आली होती .यावेळी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ च्या वतीने आमदार सत्यजित तांबे .शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह .शिक्षण संचालक शरद गोसावी यांना निवेदन देऊन प्रश्न सोडविण्यांची मागणी केली होती या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली असुन शिक्षण आयुक्त स्तरावरील प्रश्न सोडविण्यात आले असुन शासनस्तरावरील प्रश्नासाठी शिक्षण आयुक्त कार्याल्याकडून पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन पदवीधर आमदार व शिक्षक संघटना पदाधिकारी यांना शिक्षण आयुक्त कार्याल्याकडुन देण्यात आले.
यामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांना पदोन्नती देतांना TETउत्तीर्ण सक्ती नको तसेच शिक्षण संचालक यांनी 14मे 2026रोजी पदोन्नती बाबत पत्रात दुरूस्ती करून जिल्हा परिषद अंतर्गत पदोन्नती प्रक्रिया ज्या दिवशी सुरू करण्यात आली त्या दिवशी TET उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांचा समावेश अंतिम सेवाजेष्ठ यादीत समाविष्ट करून सेवाज्येष्ठतेनुसार विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख ,उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या पदोन्नती करणे. नागपुर खंडपीठाच्या निर्णयानुसार 6वी ते 8या वर्गाला शिक्षकविणा-या विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी देणे.राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांप्रमाणे व इतर राज्य पुरस्कार प्राप्तांप्रमाणे कायमस्वरुपी ओळखपत्र पत्र देणे व रेल्वे आणि बस प्रवासात सवलत देणे.2014पासुन राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या दोन जादा वेतनवाढ बंद करण्यात आल्या त्या पुर्वी प्रमाणे सुरू करणे.
न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्राप्रमाणे 24वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी सरसगट मंजुर करणे.राज्यातील शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या रिक्त जागा भरणे .खाजगी व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांच्याप्रमाणेच प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना अर्जित रजारोखीकरणाचा लाभ देणे. जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षकांना 10:20:30 आश्वासित प्रगती योजना मंजुर करणे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कॅशलेश योजना मंजुर करणे.केंद्रसमन्वयक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना केंद्र समन्वयक म्हणुन पदस्थापना देणे. शिक्षकांकडील अशैक्षणिक व ऑनलाईन कामे कमी करणे .ऑनलाईन कामे आठवड्यात एक दिवस शनिवारीच शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून करून घेणे इतर दिवशी केवळ अध्यापनाचेच काम शिक्षक व मुख्याध्यापक यांना असावे .
शिक्षकांकडील BLo हे काम काढुन घेणे .किंवा वारंवार त्याच शिक्षकांची नियुक्ती बी एल ओ कामासाठी करण्यात येऊ नाही.एक शाळा एक लिपिक व एक सेवक द्यावा .मार्च 2024च्या संच मान्यतेचा शासन निर्णय दुरूस्त करण्यात यावा.
विना अनुदानित शाळांना अनुदान मंजुर करणे यासह आदि प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली आहे.पदोन्नतीबाबत 14मे2026 शिक्षण संचालक कार्याल्याकडुन जे पत्र काढण्यात आले आहे ते सर्वोच्च न्याल्याच्या आदेशानुसार काढले आहे याबाबत सकारात्मक विचार करून शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात येईल .
विषय शिक्षकांना न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर वेतनश्रेणी मंजुर करण्यासाठी व शासन निर्णय काढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल .राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक यांच्या प्रश्नासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल . शिक्षकांना जिल्हाधिकारी व तहसिलदार या कार्याल्याकडुन देण्यात येणार कामे हे शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत देण्याबाबत कळविण्यात येईल .आयुक्त व शिक्षण संचालक स्तरावर जे प्रश्न सोडविणे शक्य आहे ते सोडविण्यात येतील असे शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रतापसिंह व शिक्षण संचालक महेश पालकर .शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आमदार सत्यजित तांबे व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी राज्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांना आश्वासन दिले असे राज्य प्रसिद्धी प्रमुख रमेश मुनेश्वर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद व खाजगी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच सह संचालक ,उपसंचालक यासह आदि उपस्थित होते.


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .