पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :
राज्य शासनाने २०२५-२६ च्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन आवेदने मागविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २७ जून, २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून https://forms.gle/EgZ266AqNDxFJDZW8 या लिंकवर नावनोंदणी सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांमधील इच्छुक शिक्षकांनी दिनांक १० जुलै, २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदन करावे, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जात असल्याची माहिती शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
https://forms.gle/EgZ266AqNDxFJDZW8
या लिंकवर फार्म भरू शकता..


आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .