शिक्षक दिनी राज्यातील ४२ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार' जाहीर

शालेयवृत्त सेवा
0






नाशिक ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्यातील शिक्षकांचे व्यासपीठ असलेले शिक्षक ध्येय, नाशिक; साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, हिंगणघाट, जिल्हा वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांसाठी 'कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारा'साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमागे शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच मुख्य उद्देश होता. 


राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. प्राथमिक गटात (अंगणवाडी ते सातवी) २८ आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात (आठवी ते पदवीपर्यंत) १४ असे एकूण ४२ विजेत्या शिक्षिका, शिक्षकांची निवड करण्यात आली.  

कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार विजेते : प्राथमिक गटात आनंद हिरालाल जाधव, बिदर, कर्नाटक; योगिता मधुकरराव भुसारी, अमरावती; राजु बापूराव नागरगोजे, लातूर; निलेश शिवाजीराव पवार, नंदुरबार; सोनिया सतिश राव, मुंबई; कविता अमोल खासबागे, अमरावती; मीना विजय सोनकुसळे, अमरावती; श्रावण कारभारी सोनवणे, नाशिक; उदय शिवराम साळवी, ठाणे; रेखा दत्तू ताम्हणे, जळगांव; समाधान शिवाजी वानोळे, यवतमाळ; रविंद्र भटू अहिरराव, नंदुरबार; अन्नपूर्णा शंकरराव सुवर्णकार, यवतमाळ; अनूप कुलकर्णी, नाशिक; सोनाली संदिप धोटे, अमरावती; दिलीप बान्या पवार, नंदुरबार; शरणप्पा भीमराय फुलारी, सोलापूर; उमा भाऊराव पाटील, छत्रपती संभाजीनगर; विनय विष्णू राणे, रत्नागिरी; कैलास किसनराव तुपे, बीड; हेमलता भगवान आखाडे, गडचिरोली; जगदिश सिताराम महाजन, जळगांव; शितल एकनाथराव सोनवणे, जळगांव; सखाराम अंकुलू झोडे, गडचिरोली; समय्या लचन्ना सद्दी, गडचिरोली; दुंडण्णा मादन्ना कोळी, सोलापूर; निर्मला दिलीपराव नंदूरकर, वर्धा; डॉ. फकीरा भगवान राजगुरू, बुलढाणा आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात डॉ. इस्माईल महाबुब गुलाब पठाण, कोल्हापूर; डॉ. उदय अनंत माळगांवकर, कल्याण; पुष्पा मोहन कोळी, मुंबई; विजया विठ्ठलराव ढगे, वर्धा; संतोष अशोक वेदपाठक, सोलापूर; दीपावली विनायक पाटील, जळगांव; विजय दत्ताजी जाचक, यवतमाळ; बंडू लक्ष्मणराव खांडरे, वर्धा; योगिता मुरलीधर पाटील, नाशिक; श्यामसुंदर आनंदराव मेघरे, वर्धा; शैला महेश पाटील, सोलापूर; निलेश दत्तात्रय गवळी, पालघर; किरण प्रतापसिंह कदम, पुणे; सचिन बाळासाहेब तावरे, पुणे; यांची निवड करण्यात आली आहे. 


सर्व विजेत्यांचे शिक्षक ध्येय, साई समर्पण संकल्प, नांदेड; श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई, यशिता गार्डन नर्सरी, वर्धा आणि आई कनकाई सामाजिक संस्था, होडगांव (कोंड), ता. माणगांव जि. रायगड यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)