एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत’ — गोविंदेश्वर शाळेत विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) : 

गोविंदेश्वर प्राथमिक शाळा, तरोडा बु. येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांच्या कार्याची व जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनी कु. सानवी गायकवाड हिने मुख्याध्यापिकेची, तर विद्यार्थी अक्षय गवाले, रुद्रा सरकुंडे, श्रेया पांचाळ, अक्षरा तरटे, स्वरा गायकवाड, श्रुष्टि लहाडे व स्नेहल जाधव यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत शाळेचे दैनंदिन कामकाज पाहिले.


विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेत शाळेचे कामकाज उत्साहाने पार पाडले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान याबाबत मार्गदर्शन केले.


या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला असून, विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव व आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)