बळीराजा आधार अभियान ; एक हात मदतीचा!

शालेयवृत्त सेवा
0

  





माहूर पंचायत समिती शिक्षण विभागाचा अनोखा उपक्रम..


श्रीक्षेत्र माहूरगड ( एस.एस. पाटील ) :

         रेणुका माता नवरात्र उत्सव श्रीक्षेत्र माहूरगड शिक्षण विभाग पंचायत समिती माहूर एक हात मदतीचा अभियानात सुरुवात झालेले आहे. बळीराजासाठी, दुष्काळात होरपळलेला जगाचा पोशिंदा त्यांच्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या लक्षवेधी उपक्रमाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

       नवरात्र उत्सव श्रीक्षेत्र माहूरगड टी पॉइंट येथे बळीराजा आधार अभियान या प्रकल्पांतर्गत बळीराजा आधार-एक हात मदतीचा यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती माहूर यांनी चालवलेला एक अनोखा उपक्रम व आयोजन उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी आनंदीमय यासाठी बळीराजा मदत अभियान राबविले जात आहे. 

        जमा झालेल्या पैशातून माहूर परीसरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे अभियान प्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)